घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वगुरु म्हणत केली विनंती, म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वगुरु म्हणत केली विनंती, म्हणाले…

Subscribe

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. राज्याती बदनामी करणाऱ्यांना मोदींनी आवर घालावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) दिलेल्या निकालाबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर यावेळी अनिल परब यांनी कोर्टाच्या कायदेशीर बाबींचे वाचन करून दाखवले. अनिल परब हे स्वतः दिल्लीला या सुनावणीकरिता हजर राहिले होते. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबतचे मुद्दे स्पष्ट करून सांगितले. पण यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आवाहन केले आहे. राज्याती बदनामी करणाऱ्यांना मोदींनी आवर घालावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Uddhav Thackeray requested PM Narendra Modi to call him Vishwaguru)

हेही वाचा – 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, शिवसेना ठाकरे गट अध्यक्षांना पत्र लिहिणार

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांना विनंती आहे की, राजकारण आपल्या ठिकाणी आहे, प्रश्न हिंदूत्वाचा, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा आहे, ते आता विश्वगुरु आहेत, त्यामुळे देशाची आणि महाराष्ट्राची बदनामी ज्या गद्दारांमुळे होत आहे अशांना पाठिंबा देण्याचे त्यांनी थांबवले पाहिजे. या सरकारला पायऊतार करुन राज्यात निवडणुका घेतल्या पाहिजे, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करत हे सरकार बेकायदेशीर आहे, असे पुन्हा एकदा म्हंटले आहे. तर आमच्याकडून पक्ष आणि पक्ष चिन्ह काढून घेतल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेलो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकाल देताना इकडे काही वेडंवाकडं केलं तर आम्ही कोर्टात जाऊ. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच अध्यक्षांच्या विरोधात कोर्टात गेल्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायाल जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि निकाल लावावा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर आता डबल इंजिन सरकारमध्ये असलेलं हे पोकळ इंजिनच सरकार लवकरच बाजूला काढून टाकणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -