घरमहाराष्ट्रबीएसएफचे शहीद जवान सुनील ढोपेंना न्याय मिळवून देऊ - राज ठाकरे

बीएसएफचे शहीद जवान सुनील ढोपेंना न्याय मिळवून देऊ – राज ठाकरे

Subscribe

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून काल त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कांरजा तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सीमा सुरक्षा दलाचे शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत राज यांनी ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच त्यांचे सांत्वन केले. सुनील ढोपे हे बीएसएफमध्ये कार्यरत होते. मेघालय राज्यातील शिलाँग येथे कर्तव्य बजावत असताना १५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाणून घ्या – राज ठाकरेंच्या बदलत्या स्वरूपाचा ‘राज’!

सुनील ढोपे यांनी आत्महत्या केली, असा दावा सीमा सुरक्षा दलाने केलेला आहे. मात्र कुटुंबियांनी याविरोधात लढा सुरु केला आहे. कुटुंबाच्या लढ्याला संबंध वाशिम जिल्ह्यातून पाठिंबा मिळालेला आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ढोपे यांचे बंधू ज्ञानेश्वर ढोपे यांच्याकडून या प्रकरणाची संपुर्ण माहिती घेतली. प्रकरणाची सत्यता पडताळून जवान सुनिल ढोपे मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचे आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे.

- Advertisement -

…त्यांनी आत्महत्या केली नाही, करुच शकत नाही

माझ्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, अशी माहिती सुनील ढोपे यांच्या पत्नीने दिली होती. “माझा छळ होत असला तरी मी नोकरी सोडून घरी येणार नाही. मी पळपुटा नाही आणि आत्महत्याही करणार नाही”, असे ते मला सांगायचे. त्यामुळे ते कधीच आत्महत्या करु शकणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांच्या पत्नीने व्यक्त केला होता.

विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं वेगळं रूप!

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून राज ठाकरेंचं एक वेगळं रूप या दौऱ्यात पाहायला मिळत आहे. याआधी कधीही या आपल्या नेत्याच्या जवळ जाता न येणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आता चक्क राज ठाकरे यांच्यासोबत बसण्याची संधी मिळत आहे. नुसतीच संधी नाही, तर राज ठाकरे चक्क या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांच्या मांडीला मांडी लावून जेवताना देखील पहायला मिळत आहेत!

आणि राज ठाकरे ढाब्यावरच थांबले जेवायला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -