घरमहाराष्ट्रआम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?, बच्चू कडूंचा विरोधकांना सवाल

आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?, बच्चू कडूंचा विरोधकांना सवाल

Subscribe

भाजपाने शिंदे गटातील आमदारांना विकत घेतल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान,या सर्व आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांवरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांना सवाल केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड पुकारले. याचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत.  “गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके”  अशा घोषणा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात आहेत. शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. म्हणजेच भाजपाने शिंदे गटातील आमदारांना विकत घेतल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान,या सर्व आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांवरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांना सवाल केला आहे.

“आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का? तुम्हाला जर प्रत्येक आमदाराला किती खोकी दिली याबाबत माहिती होती तर त तुम्ही अडवायचं होत. आम्हाला थांबवायचं होतं. विरोधक अशा प्रकारचे आरोप करतच असतात त्याला काहीही अर्थ नसतो”, असं बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आले, आले 50 खोके आले; विरोधी पक्षाचा शिंदे गटावर हल्लाबोल

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. शिंदे – फडणवीस सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मात्र अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु झाले. महागाई, पुरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाईविरोधात विरोधकांनी आज अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे – फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईडीच्या कारवाईविरोधातही विरोधकांनी ईडी सरकार हाय हाय…, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला होता. त्यावरून बच्चू कडू यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही’; छगन भुजबळांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

कोणाच्या पाया पडायची गरज नाही

फोन टॅपिंगप्रकरणी बच्चू कडू यांचं नाव पुढे येत आहे. याप्रकरणीही त्यांनी खुलासा केला. “माझा फोन टॅप करण्यात आला होता. मात्र, हे सगळ चुकीचं आहे. नेत्याचा फोन टॅप करणं हा नालायकपणा आहे. दरम्यान, या प्रकरणात मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. अशी वेळ या बच्चू कडूवर येणार नाही. काही केले असेल तर सिद्ध करावे. त्यासाठी कोणाच्या पाया पडायची गरज नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा – …ही कुठली पद्धत; चौकात आहात का तुम्ही?, नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापले

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -