शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत काय ठरलं? संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

National Executive Meeting | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्राच्या विकासाकरता कोणती धोरणं राबवता येईल, याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

shivsena

National Executive Meeting | मुंबई – शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिवसेनेची आज पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे, रामदास कदम, आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, उदय सामंत यांच्यासह शिवसेनेतील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासाकरता कोणती धोरणं राबवता येईल, याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – ठरलं! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब

वि.दा सावरकरांना भारतरत्न पुरस्कार

भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार वि.दा.सावरकर यांना द्यावा असा ठराव गजानन कीर्तिकर यांनी या बैठकीत मांडला

भुमिपुत्रांना ८० टक्के स्थान

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक भुमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य देण्याचा ठराव मांडण्यात आला.

राष्ट्रीय पुरुषांची यादी

वीरमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांची नावं राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत यावी असा ठराव मांडला.

शिस्तभंग समिती

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज महत्त्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यानुसार, पक्षाविरोधी कारवाई झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिवसेनेने शिस्तभंग समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री दादा भुसे असणार आहेत, तर मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे या समितीचे सदस्य असणार आहेत.

हेही वाचा – पक्षविरोधी कारवाया रोखण्यासाठी शिवसेनेचा नवा डाव, बैठकीत नव्या समितीची स्थापना

सूचनांचे पालन करा

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करा, अशा सूचना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांना दिले.

गडकिल्ल्यांचं संवर्धन होण्याकरता पुढाकार घेणार

चर्चगेट स्थानकाला चिंतामणराव देशमुख नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा, याकरातही ठराव आजच्या बैठकीत मांडण्यात आला.

राज्यातील तरुण वर्ग स्पर्धा परिक्षांकडे वळावेत याकरता ग्रामीण भागातील आणि राज्यातील सर्व काना-कोपऱ्यात प्रशिक्षण वर्ग सुरू करणार

बाळासाहेबांच्या विचारानुसार युती कोणासोबत करावी आणि कोणासोबत करू नयेत ही उद्दीष्ट पाळणार

संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत काय असावे यावर विचार झाला.

गेल्या आठ महिन्यांत सरकार जे काम करतंय त्या कामाची नोंद बैठकीत घेण्यात आली. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.