घरमुंबई'भारत रंग महोत्सवा'तून साजरा होतोय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालायचा...

‘भारत रंग महोत्सवा’तून साजरा होतोय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालायचा विशेष उपक्रम

Subscribe

स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ''२२ वा भारत रंग महोत्सव'' हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा नाट्य महोत्सव येत्या ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे.

मुंबई: नाटक ही अशी कला आहे जी मागच्या पिढीला पुढच्या पिढीसोबत जोडून ठेवते. भारतीय नाट्य कलेला अनन्य साधारण महत्व आहे. त्याचबरोबर समृद्ध असा इतिहास सुद्धा आहे. सध्या भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभरात साजरा केला जात आहे. त्याच अंतर्गत राज्यासह देशभरातच अनेक कार्यक्रम साजरे केले आहेत. अशातच स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ”२२ वा भारत रंग महोत्सव” हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा नाट्य महोत्सव येत्या ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे.

हे ही वाचा – माय महानगर विशेष : जाणून घ्या, ‘तिरंग्या’बद्दलची विस्तृत माहिती

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे ”22 वा भारत रंग महोत्सव” आणि अमृतमहोत्सवाची सांगड घालत संपूर्ण देशभरात 16 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत विशेष कार्यक्रम सादर केले जात आहेत.

याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मुंबईतही हा महोत्सव होणार आहे. मुंबईत 9 ते 13 ऑगस्ट 2022 या काळात राष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतल्या महोत्सवाची सविस्तर माहिती आज 8 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतदेण्यात आली. एनएसडीचे संचालक रमेश चंद्र गौड यांनी मुंबईत पत्रसूचना कार्यालयात आयोजित ऐकलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक आणि वाणी त्रिपाठी टिक्कू यांची या उद्घाटन समारंभाला विशेष उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)चे संचालक प्राध्यापक रमेश चंद्र गौड या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – ताजमहाल सोडून आग्र्यातील सर्व ऐतिहासिक स्थळांवर रोषणाई , काय आहे नेमके कारण ?

उद्घाटन समारंभानंतर लगेचच, चंद्रकांत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या “आय एम सुभाष” या नाटकाचा प्रयोग होईल. 10 ऑगस्टला संध्याकाळी डॉ मंगेश बनसोड यांनी लिहिलेल्या ‘ गांधी-आंबेडकर’ नाटकाचा प्रयोग होईल. 11 ऑगस्टला रुपेश पवार यांचं नाटक “ऑगस्ट क्रांती”, 12 ऑगस्टला सुनील जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टिळक आणि आगरकर” या नाटकांचा प्रयोग होणार आहे. सर्व नाटकांचे प्रयोग संध्याकाळी सात वाजता होतील. य नाट्य महोत्सवाची सांगता 13 ऑगस्ट मोहम्मद नजीर कुरेशी दिग्दर्शित ‘रंग दे बसंती चोला’ या नाटकाने होईल. या महोत्सवातील सर्व नाटकांचं सादरीकरण विनामुल्य असणार आहे.

‘महाराष्ट्र हे एक प्रगतिशील राज्य आहे. महाराष्ट्रात आणि भारतात नाटकांना सुद्धा एक मोठी परंपरा आहे. मुंबईत सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. पु. ल. देशपांडे अकादमी मध्ये हा नाट्य महोत्सव साजरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याचा विशेष आनंद सुद्धा होत आहे. असं पु. ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे म्हणाले.

हे ही वाचा –  बर्मिगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी, पदकसंख्या 26 वर

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘२२ वा भारत रंग महोत्सवा’ची थीम ही भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचे स्मरण व्हावे म्हणून या संबंधी नाटकांची ठेवली आहे. यामध्ये देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सेनानी ज्यांच्या बद्दल जास्त कुठे माहिती उपलब्ध नाही अश्या स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याचा आढावा या नाटकांमार्फत घेण्यात येणार आहे. या मध्ये ‘टिळक आणि आगरकर’ या मराठी नाटकाचा सुद्धा समावेश कारण्यात आला आहे. नाटकांच्या माध्यमातून १५ ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली देण्यात येणार आहे’. असं एनएसडीचे संचालक रमेश चंद्र गौड म्हणाले.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -