भाजपाकडून समान वागणूक मिळत नाही; शिंदेंच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे वाचला तक्रारींचा पाढा

CM Eknath Shinde
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  पुढील काळातील त्यामुळे विरोधी पक्षाकडून जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपासोबत सत्तेत आलेल्या शिदें गटाच्या खासदारांमध्ये मात्र नाराजीनाट्य सुरू असल्याचे समजते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बुधवारी (24 मे) रात्री शिंदे गटाच्या खासदारांची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित काही खासदारांनी भाजपाविरोधात तक्रारींचा पाढा मुख्यमंत्र्याकडे वाचला असल्याचे समजते. (BJP does not get equal treatment)

मुंबई महापालिका निवडणुका कधीही लागू शकतात, त्यात पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांमध्ये मोठा, छोटा भाऊ आणि कोण किती जागा लढवणार यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. असे असताना भाजपा आणि शिंदे गटातही सारेच काही आलबेल नसल्याचे समजते. (Shinde’s MPs read the complaints to the Chief Minister)

बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यावेळी खासदारांसह पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी काही खासदारांनी भाजपविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि काही आमदार खासदारांनी बंडखोरी केली आणि भाजपासोबत युती जोडत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल असे वाटत असताना एकनाथ शिंदे यांना अनपेक्षिरित्या मुख्यमंत्रीपद मिळाले. राज्यात विकासाची कामे सुरू झाली, मात्र तरीही शिंदे गटाचे खासदार आणि नेते भाजपाविरोधात नाराज असल्याचे समजते.

सरकारमध्ये भागीदार असली तरी भाजपाकडून समान वागणूक मिळत नसल्याची खंत या खासदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्याकडे बोलून दाखवली. यावेळी त्यांनी निधीवाटपातही दुजाभाव होत असल्याचा आरोप केला असल्याचे समजते. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी प्रकल्पासाठी आम्हाला अधिक निधी मिळावा आणि भाजापकडून समान वागणूक मिळात नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबई आणि ठाणे महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार
वर्षा बंगल्यावरील बैठकीत विधानसभा आणि लोकसभासाठी जागावाटपाचा मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे समजते. यावेळी खासदारांनी आमच्या जागांना धक्का लागू नये, अशी मागणी केली आहे. याशिवाय निवडणुका लागल्यानंतर आम्हाला मिळालेल्या जागाच्या प्रचारात भाजपने सक्रिय राहावे. हा मुद्दा भाजप पक्षश्रेष्ठी आणि नेतृत्वाकडे मांडावा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. महापालिका निवडणुका कधीही लागू शकतात, त्यामुळे मुंबई आणि ठाणे महापालिकेवर आपलीच सत्ता मिळवण्याचा निर्धार शिंदे गटाच्या नेत्यांनी बैठकीत केला आहे. याशिवाय ठाकरे गटाला पालिका निवडणुकीत मात कशी द्यायची, याची रणनीतीही आखण्यात आल्याचे समजते.