घरमुंबईराज ठाकरेंना पाठिंबा; मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात हायकोर्टात जाणार - मोहित कंबोज

राज ठाकरेंना पाठिंबा; मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात हायकोर्टात जाणार – मोहित कंबोज

Subscribe

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आमचा राज ठाकरे यांना मोळाव्यात केलेल्या विधानाला आमचा पांठिंबा असल्याचं म्हटलं. तसंच, मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही कंबोज यांनी म्हटलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवरुन हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात बोलू नका असा फतवा काढला. मात्र, आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आमचा राज ठाकरे यांना मोळाव्यात केलेल्या विधानाला आमचा पांठिंबा असल्याचं म्हटलं. तसंच, मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही कंबोज यांनी म्हटलं.

”मुंबईतील लोक आता दिवसातील पाच वेळा हनुमान चालीसा ऐकणार यासंदर्भात आम्ही राज ठाकरेंचे अभिनंदन करतो. ही मागणी मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत होती आणि या विषयाला काल राज ठाकरेंनी दुजोरा दिला. मुंबईतल्या मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पिकर हे उतरवण्यात यावेत. तसंच, मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर कारवाई केली पाहिजे. तसंच देशातील इतर न्यायालयांनी मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पिकर उतरवण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. त्यामुळं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी न्यायालयांचे आदेश लागू करा आणि तुम्ही सुरू केलेल्या ध्वनीप्रदुषणाविरोधातील मोहिमेअंतर्गत या मशिदींवरील लाऊडस्पिकर उतरवण्यात यावेत, अशी मागणी आहे”, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं .

- Advertisement -

”महाराष्ट्रासह देशाचे राज ठाकरे मोठे नेते आहेत. ज्या विषयावर ते काल बोलले तो सर्वांच्या भावनेचा विषय आहे. हा फक्त धर्माचा विषय नाही. ध्वनीप्रदुषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. लहान मुलांना अभ्यासात अडथळा येतो. तसंच, अनेक आजार असलणाऱ्या लोकांना या लाऊड स्पिकरचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय कोरोनाच्या काळात अनेक लोकांची या लाऊड स्पिकरविरोधात तक्रारी येत होत्या. त्यामुळं यासंदर्भात आम्ही येत्या काळात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. तसंच, मशिदींवरील हे अनधिकृत लाऊड स्पिकर लवकरात लवकर काढण्याचे आव्हान आम्ही मुंबई पोलिसांना देत आहोत”, असं मोहित कंबोज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा MIM कार्यकर्त्यांसाठी फतवा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -