घरमुंबईशिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांच्या भागात मविआचा विजय - संजय राऊत

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांच्या भागात मविआचा विजय – संजय राऊत

Subscribe

मुंबई : राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल (Agricultural Produce Market Committee Election Results) शनिवारी (29 एप्रिल) समोर आले असून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारला चांगलाच दणका दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांच्या भागात मविआचा विजय झाला असल्याचे मत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, काल कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागले आहेत आणि आजसुद्धा काही निकाल लागणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समीत्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि संघटना करतात. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फार कधी ताकदीने उतरली नव्हती. पण या वेळेला शिवसेना महाविकास आघाडीसह बाजार उत्पन्न समित्यांमध्ये उतरली आणि विजयी झाली आहे. भाजपा कोणतेही आकडे दाखवत असली तरी आपण आकडे पाहिल्यास महाविकास आघाडीला बाजार समिती निवडणुकांमध्ये निर्विवाद यश मिळाले आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा ग्रामीण भागातला शेतकरी हा सध्याच्या सरकारला भाजपाला वैतागला आहे. या सरकारला घालवायला निघाला आहे आणि ही पहिली लाथ सरकारच्या कंबरड्यावर मारली असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, मिंधे गटातले जे आमदार आहेत त्यांच्या मतदार संघामध्ये शिवसेनेचे पॅनेल विजयी झाले आहे. हा एक चांगला संकेत असून लोकांची ‘मन की बात’ स्पष्ट झाली आहे. पारोळा, मालेगाव, बुलढाणा किंवा अन्य अनेक भागामध्ये जिथे-जिथे शिवसेनेशी गद्दारी केलेले आमदार आहेत, त्या प्रत्येक भागामध्ये शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं पॅनेल विजयी झाले आणि हा लोकमतचा कौल जनतेचा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, आम्ही वारंवार सांगत आलो आहोत की, निवडणुकीला सामोरे जाऊया, पण हे लोक सामोरे जात नाही. कारण हे लोक निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहेत. कोणतेही निवडणूक घ्या महाविकास आघाडीच जिंकून येणार आहे.

उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. अति विराट अशा प्रकारची सभा होणार आहे. दोन सभा नंतर महाराष्ट्रातील राजधानी मुंबईमध्ये सभा होत आहे आणि ही सभा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली होत आहे, तसेच महाविकास आघाडीची देखील मोठी तयारी दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी विशेष मेहनत या सभेसाठी घेतलेली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या सभेनंतर महाराष्ट्रातील चित्र आणखीन स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -