घरठाणेLok Sabha 2024 : खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे; उदयनराजे भोसलेंवर जितेंद्र...

Lok Sabha 2024 : खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे; उदयनराजे भोसलेंवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 वी उमेदवारांची यादी जाहीर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. पण या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 वी उमेदवारांची यादी जाहीर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. पण या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. ‘सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. तिकीट द्या, तिकीट द्या करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी नाही’, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. (Lok Sabha Election 2024 sharad pawar ncp leader jitendra awhad slams bjp udayanraje bhosale)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेदरम्यन जितेंद्र आव्हाडांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. “छत्रपतींची कोल्हापूरची गादी अथवा सातारची गादी असो. या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचाराचे पालन करुन पुढे चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्य, दुष्कृत्य साताऱ्यात आणि सगळीकडे बघितली आहेत. त्यांचं वागणं गादीचा सन्मान ठेवणारे असते तर ठीक होते. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. आजही छत्रपतींच्या गादीला सर्वजण मान देतात, त्या गादीचा मान ठेवायला पाहिजे होता. आपण कोणासमोर झुकत आहोत, याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता. पण साताऱ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी ते चार दिवस दिल्लीत होते. दिल्लीच्या तख्तासमोर मला तिकीट द्या, तिकीट द्या, असे सांगत होते. ही गोष्ट लोकांना फारशी आवडणार नाही”, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीका केली.

- Advertisement -

खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे – जितेंद्र आव्हाड

“शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद, हिम्मत, कर्तृत्त्व आहे त्यांना मोठं केलं. त्याचा वारसा काय हे कधीच बघितले नाही. शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राजेंना अंगावर घेतले आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेही वाचा – Maharashtra Bhushan accident : महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेचा ठपका कुणावर? अहवालाचं काय झालं?

- Advertisement -

“शाहू महाराजांना जसं घरी बसून तिकीट दिलं, त्यांना कुठे तिकीट द्या, तिकीट द्या, करत फिरावे लागले नाही. साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशाप्रकारे तिकीट मिळवणे म्हणजे त्या गादीचा अपमान आहे. तुम्ही ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिले होते. त्या गादीवर बसलेला वारस हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही, तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे”, अशीही टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघात भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली तर, त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत सातारा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – Ram Navami Wishes : आजची श्रीराम नवमी माझ्यासाठी विशेष आनंददायी; राज ठाकरेंकडून शुभेच्छा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -