घरठाणेमध्य रेल्वेवर एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सातपटीने वाढली; 'ही' तीन स्थानके ठरली...

मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सातपटीने वाढली; ‘ही’ तीन स्थानके ठरली टॉप 3

Subscribe

एकीकडे एसी लोकलला विरोध असताना दुसरीकडे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

ठाणे – गेल्या सहा महिन्यांत वातानुकूलित लोकलने (AC Local on Central Railway) ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७ पटीने वाढली आहे. त्यामुळे या स्थानकांचा समावेश टॉप ३ (Top 3 Stations for AC local) मध्ये झाला असून सर्वाधिक १० लाख ५० हजार ५११ प्रवासी संख्या ही ठाणे स्थानकात असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली. यावरून एसी लोकलला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – प्रवाशांच्या संतापापुढे रेल्वे प्रशासन झुकले, मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या 10 फेऱ्या रद्द

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना वातानुकूल लोकलमुळे सुरक्षित आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला आहे. गेल्या सहा महिन्यांत वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी-२०२२ मधील दैनंदिन सरासरी ५ हजार ९३९ प्रवाशांवरून ऑगस्ट-२०२२ मध्ये ४१ हजार ३३३ प्रवासी इतकी वाढली आहे. म्हणजेच, जवळपास ७ पटीने वाढली आहे. सध्या, मध्य रेल्वे ५६ वातानुकूलित लोकलसह एकूण १ हजार ८१० उपनगरीय सेवा चालवते.

हेही वाचा – मुंबईत रुळांवर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे संभाव्य विघ्न टळले

- Advertisement -

तसेच फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत वातानुकूलित लोकलच्या प्रवासांची संख्या- टॉप ३ स्थानकांचा समावेश झाला असून यामध्ये ठाणे स्थनाकातून सर्वाधिक १० लाख ५० हजार ५११ तर डोंबिवली-९ लाख ३९ हजार ४३१ आणि कल्याण- ९ लाख १ हजार ८५९ इतकी आहे.

हेही वाचा – एसी लोकल बंद केल्या पाहिजेत; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर शरद पवार आक्रमक

मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे आणि वातानुकूलित लोकल चालवणे ही त्यापैकी एक आहे. वातानुकूलित लोकलला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, एसी लोकलविरोधात आंदोलन

दरम्यान, नॉन-एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एसी लोकलमुळे खोळंबा होतो. एसी लोकल गेल्याने त्यापाठून येणाऱ्या नॉन एसी लोकलमध्ये तुफान गर्दी होते. परिणामी चेंगराचेंगरी सदृष परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी एसी लोकलविरोधात गेल्या आठवड्यात आंदोलन छेडले. कळवा स्थानकात रेल रोको करण्यात आला होता, तर बदलापूरमध्येही प्रवाशांनी आंदोलन करून स्टेशन अधिकाऱ्यांना एसी लोकल बंद करण्याचे निवेदन दिले. गेले आठवडाभपर एसी लोकलविरोधात प्रवाशांचा रोष निर्माण झाल्याने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी तब्बल दहा एसी लोकल बंद करण्यात आल्या.

एकीकडे एसी लोकलला विरोध असताना दुसरीकडे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -