घरमुंबईमेट्रोने लावली मुंबईची वाट – संजय निरुपम

मेट्रोने लावली मुंबईची वाट – संजय निरुपम

Subscribe

मुंबईमध्ये मेट्रोची कामे सुरु आहेत मात्र प्रत्यक्षात ही कामे होत नाहीत. तसेच या मेट्रोमुळे मुंबईची वाट लागली असल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

मुंबईमध्ये ५ मेट्रोची कामे सुरु आहेत. मेट्रो २ A, मेट्रो २ B, मेट्रो ७, मेट्रो ६, मेट्रो ४ या मेट्रोची कामे संपूर्ण मुंबईभर सुरु आहेत. मात्र खर बघायला गेले तर मेट्रोची कामे सुरु आहेत असे मुंबईकरांना फक्त भासवले जात आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून हा फक्त दिखावा होत असल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

२०३० पर्यंतही मेट्रोची कामे पूर्ण होणार नाहीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषित केले होते की २०१६ ला मेट्रोची कामे सुरु झालेली आहेत आणि २०१९ पर्यंत मेट्रो A आणि मेट्रो B पूर्ण होतील. आता मुख्यमंत्री सांगत आहेत की २०२२ पर्यंत मेट्रो कामे पूर्ण होणार आहे. परंतु खरी परिस्थिती अशी की आता २०१९ सुरु आहे, ५ मेट्रो पैकी एकाचे हि काम पूर्ण झालेले नाही. २०२२ नाही तर २०३० पर्यंत देखील मेट्रोची कामे तयार होणार नाहीत. कारण या सरकारचे योग्य प्लानिंग नाही, डिझाईन नाही, मुंबईकरांना विश्वासात घेतलेली नाही. तसेच मेट्रो कार्यकर्त्यांना देखील विश्वासात घेतलेले नाही. त्याचसोबतच मेट्रो स्थानकांसाठी जागा अद्याप ताब्यात घेतलेल्या नाहीत. तर हायवेला लागून असलेल्या सर्विस रोडवर काही मेट्रोची स्थानके येणार आहेत. पण हे होऊ शकत नाही आहे. कारण आजूबाजूला घरे, इमारती आणि कार्यालये आहेत या सर्व अडचणींमुळे मेट्रोची कामे होणार नाहीत.

- Advertisement -

संजय निरुपम पुढे म्हणाले की, शहरात वाहतुकीचे अडथळे मेट्रोमुळे निर्माण होत आहेत. वास्तविक दक्षिण मुंबई प्रमाणे भुयारी मेट्रो होणे गरजेचे आहे. खर्च थोडा वाढला असता परंतु काम वेगाने झाले असते. पवई लेकजवळ स्टेशन येणार आहे. त्याला आमचा आणि स्थानिकांचा विरोध आहे. संपूर्ण मुंबईत ५ मेट्रोची कामे सुरु आहेत परंतु या सरकारने अजून एकही मेट्रो यार्ड (कारशेड) उभे केलेले नाही. मुंबईचा श्वास असलेल्या आरे सारख्या भागात भाजप सरकार मेट्रो यार्ड मुद्दामून आणत आहेत, त्यालाही आमचा आणि आरे बचाव संस्थेचे कार्यकर्ते आणि स्थानिकांचा याला विरोध आहे.

अनेक ठिकाणी मेट्रोची कामे बंद आहेत. सरकारची प्लानिंग संपूर्ण फसलेली आणि चुकीची आहे म्हणून उपनगराची तर संपूर्ण वाट लागणार आहे. मेट्रो १ आणि मेट्रो ६ समांतर जाणार आहे. त्याची काय गरज आहे? मेट्रो ७ दहिसर ते अंधेरी हायवे वरून जाणार आहे. अजून १५ किलोमीटर पण काम झालेले नाही आहे फक्त दिखावा आहे. मुंबईला भुयारी मेट्रोची खरी गरज आहे. सर्विस रोडवर मेट्रो स्थानके शक्य नाहीत. या सरकारने मुंबईला construction site बनवून ठेवेले आहे. कोस्टल रोड, मेट्रो प्रोजेक्ट्स आणि पुतळे यामुळे सगळीकडे constructon सुरु आहे. दिल्लीत हेच झालेले आहे. दिल्लीमध्ये १८० किलोमीटर मेट्रो आहे त्यामुळे गेली ३ वर्षात भयंकर प्रदूषण वाढलेले आहे. हीच अवस्था मुंबईची भविष्यात होणार आहे.  – नितीन किलावाला, मेट्रोचे अभ्यासक

- Advertisement -

वाचा – कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेत मेट्रो ३चा समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -