घरराजकारणवादाला तोंड: "सावरकर म्हणायचे, बलात्कार हे राजकीय शस्त्र..." वडेट्टीवारांच्या कन्येचा 'तो' व्हिडीओ...

वादाला तोंड: “सावरकर म्हणायचे, बलात्कार हे राजकीय शस्त्र…” वडेट्टीवारांच्या कन्येचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Subscribe

काॅेंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्ट्वीर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्या बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असं म्हटलंय. त्यामुळे आता राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असतात. त्यावरुन ठाकरे गटाने वीर सावरकरांवर केली जाणारी अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असं म्हटलं. परंतु आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून वीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे. काॅेंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्ट्वीर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्या बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असं म्हटलंय. त्यामुळे आता राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. Congress leader Vijay wadettiwar daughter Shivani wadettiwar says savarkar used to say that rape is political weapon now vijay wadettiwar gave an Explanation

व्हिडीओत नेमकं काय?

शिवानी वडेट्टीवार या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या आक्रमकरित्या आपले विचार मांडताना दिसून आल्या. त्यांनी आपल्या भाषणात वीर सावरकरांवर टीका केली. शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसं समजावं ? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. अशा माणसांची हे लोक यात्रा काढत असल्याचं शिवानी वडेट्टीवार यावेळी म्हणाल्या.

- Advertisement -

( हेही वाचा: भाजपचा ‘हिंदुराष्ट्र’ हा अजेंडा नाही; सुधीर मुनगंटीवार करणार ‘त्या’ ट्वीटची चौकशी? )

विजय वडेट्टीवार यांचा खुलासा

महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्येने केलेल्या वक्तव्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी समोर येत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी शिवानीला विचारलं, ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक सहा सोनेरी पानं याचा रेफरन्स घेऊन ती बोलली. तसं असेल तर त्यात वाद होण्याचा विषय नाही. मत-मतांतरं असू शकतात. मला तो रेफरन्स माहिती नाही. ती वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचा छंद आहे.

- Advertisement -

वडेट्टीवार म्हणाले की, आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. फुले, शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. नाना पटोलेंनी समर्थन केलं असेल तर काॅंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. कोणी कोणाला मानावं, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. कोणाचा अपमान करण्याचा उद्देश नाही. भाजपच्या लोकांनी सगळं वाचावं. सावरकर यात्रा निघाली तेव्हा अनेकांना त्यांच्याबदद्ल काही माहिती नव्हतं. काॅंग्रेसच्या काळात वि दा सावरकर असा धडा असायचा.

ते वाचत असताना आमच्या डोळ्यांसमोर त्यांची शक्तिशाली प्रतिमा उभा ठाकायची. परंतु 2014 पर्यंत आम्ही सावरकर वाचला आणि तो वीर सावरकर म्हणूनच मानलं. नेहरु आणि गांधींपेक्षा सावरकर मोठे आहेत, असं भासवण्याच्या नादात फूट पडली, असं वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -