घरराजकारणगुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे पाप झाकण्याचा प्रयत्न, भाजपाचा पलटवार

गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे पाप झाकण्याचा प्रयत्न, भाजपाचा पलटवार

Subscribe

मुंबई : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या टाटा एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेबाबत केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, असा पलटवार प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने आवश्यक अशा एअरबसचे तंत्रज्ञान असलेल्या सी-295 मालवाहू विमानांची बांधणी बडोद्यात केली जाणार आहे. टाटाचा हा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली आहे. या टीकेचा उपाध्ये यांनी आज समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यावर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअरबस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा त्या दृष्टीने कोणताही पाठपुरावा केला गेला नाही, असे सांगून, वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये. मुद्द्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गुरुवारी युकेच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी जसा राजीनामा दिला तसे महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने शिंदे यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

जवळपास दीड लाख कोटीचा वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. यावरून तपासे यांनी राज्य सरकारवर टीका करताना शिंदे यांना महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयश आल्याचे ते म्हणाले. गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यग्र आहेत, असाही आरोपही तपासे यांनी केला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -