घरराजकारणशेलारांच्या भाषणात श्रीकृष्ण अन् पांडव तेच, पण कौरवांतून कर्ण झाला वेगळा

शेलारांच्या भाषणात श्रीकृष्ण अन् पांडव तेच, पण कौरवांतून कर्ण झाला वेगळा

Subscribe

मुंबई : देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेतील सत्ता काबिज करण्यासाठी भाजपाने आज रणशिंग फुंकले. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना भाजपा मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी आपल्या भाषणात श्रीकृष्ण, पांडव आणि कौरवांचा उल्लेख केला. पण यावेळी महाभारतात कौरवांना साथ देणाऱ्या कर्णाला पांडवांमध्ये सामील करून घेतले.

मुंबई महापालिकेतील सत्तेचा सारीपाट पुन्हा मांडला आहे. हा डाव जिंकण्यासाठी पांडव आणि कौरव पुन्हा एकदा आमने-सामने बसले असल्याचे चित्र आजच्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात उभे करण्यात आले. पण 2017च्या तुलनते यात थोडा बदल करण्यात आला. यातून कौरवांच्या पक्षातून कर्णाला वेगळे करण्यात आले.

- Advertisement -

राज्यात सत्तेत एकत्र असतानाही 2017मध्ये झालेली महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढविली होती. त्यावेळी या निवडणुकीची धुरा भाजपा मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांच्याकडेच होती. त्यावेळी बूथप्रमुखांच्या मेळाव्यात अॅड. शेलार यांनी महाभारताचा उल्लेख करत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्रीकृष्ण असा उल्लेख केला होता. तर, शिवसेना कौरव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दुर्योधनाची उपमा दिली होती. भाजपाची बाजू सत्याची असल्याने ते पांडव असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आज झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार आशीष शेलार यांनी पुन्हा एकदा महाभारताचाच उल्लेख केला. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातले युद्ध अटळ होते. अधर्म आणि धर्म यांच्यातील ते युद्ध होते. त्यापासून बाजूला राहण्याचा सल्ला भगवान श्रीकृष्णाने कर्णाला दिला होता. कर्णाने भगवान श्रीकृष्णाचं ऐकलं नाही. युद्ध अटळ होतं, कौरव पराजित झाले, कर्णाचा वध झाला. पण आजचे महाभारत वेगळे आहे. देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला युद्धातून बाजूला काढले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत कृष्णही आमच्याबरोबर आहे आणि कर्ण सुद्धा आमच्याबरोबर आहे, असे शेलार म्हणाले.

- Advertisement -

गेल्या निवडणुकीत शेलारांनी आपले नेतृत्वगुण पणाला लावत भाजपाला तब्बल 83 जागा जिंकून दिल्या होत्या. त्याआधी भाजपाच्या अवघ्या 33 जागा होत्या. त्यामुळे आताच्या या ‘महाभारता’त सत्तेचा सारीपाट कोण जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -