VIDEO VIRAL : अचानक कुत्र्यासमोर आला सिंह अन् झालं असं काही…

व्हिडिओमध्ये सिंह आणि कुत्रा एकत्र दिसत असून, दोघांची मैत्री सोशल मिडियावर तुफान चर्चेत आहे. वास्तविक, क्लिपमध्ये सिंह कुत्र्याच्या पंजाचे चुंबन घेताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

VIDEO VIRAL Suddenly a dog came in front of the dog and something like .
VIDEO VIRAL : अचानक कुत्र्यासमोर आला सिंह अन् झालं असं काही...

हल्ली सोशल मिडियावर अनेक गोष्टी क्षणात व्हायरल होत असतात. यातील व्हिडीओ या काही नकारात्मक असतात तर काही सकारात्मक सुद्धा असतात.नुकतंच सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सिंह आणि कुत्रा एकत्र दिसत असून, दोघांची मैत्री सोशल मिडियावर तुफान चर्चेत आहे. वास्तविक, क्लिपमध्ये सिंह कुत्र्याच्या पंजाचे चुंबन घेताना दिसत आहे. दोघे एकत्र वाढले आणि आता मित्र आहेत असा दावा केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dog Lover (@doglover_s)


क्लिपमध्ये एक कुत्रा उभा असलेला दिसतो. तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा सिंह त्याच्या जवळ येतो. कुत्रा सतत शेपूट फिरवत असतो. सिंह ताबडतोब त्याच्या जवळ येतो आणि आपल्या पंजाने कुत्र्याचा हात पकडून तोंडाजवळ नेतो.जणू तो कुत्र्याच्या पंजाचे चुंबन घेत आहे. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहतात. मात्र, कुत्रा मागे जायला लागताच सिंह त्याच्या मागे धावतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून,  ‘डॉग्स लव्हर’ नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले की, त्यांच्या नात्याचा धागा खूप मजबूत आहे. दोघे एकत्र वाढले आणि आता मित्र आहेत. मात्र, हा व्हिडीओ कुठे चित्रित करण्यात आला आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. पण  या क्लिपला 59 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


हे ही वाचा – Corona Virus : किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे आदेश