घरट्रेंडिंग१२ नोव्हेंबरनंतर तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा होणार गायब!

१२ नोव्हेंबरनंतर तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा होणार गायब!

Subscribe

व्हॉट्सअॅप आता लवकरच आपल्या युजर्सचा डेटा गायब करणार आहे. आता हा डेटा मोबाईलमध्ये सेव्ह न होता गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होणार आहे. त्यामुळे आता मोबाईलची मेमरी देखील फुल होणार नाही. मात्र येत्या १२ नोव्हेंबरच्या आधी डेटा सेव्ह करावा लागणार आहे. कारण त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपचा कोणताही डेटा मिळणार नाही.

‘बिन पगारी, फुल अधिकारी’ अशी ओळख असलेले व्हॉट्सअॅप आता आपल्या युजर्सचा डेटा गायब करणार आहे. या डेटामध्ये व्हॉट्सअॅप चॅटिंग, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ या फाईल्सचा समावेश असणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅपचा डेटा हवा असल्यास १२ नोव्हेंबरपूर्वी त्याचा बॅकअप घ्यावा लागणार आहे. कारण आता व्हॉट्सअॅप एक नवीन बदल करणाच्या तयारीत आहे. या बदलामुळे व्हॉट्सअॅपचा डेटा डिलीट होणार आहे. त्यामुळे या आधीच बॅकअॅप घ्या. कारण त्यानंतर तुमच्याकडे कोणताही पर्याय नसणार आहे. यानंतरचा व्हॉट्सअॅपचा डेटा गुगल ड्राइव्हवर सेव्ह होणार आहे. हा डेटा ड्राईव्हमध्ये सेव्ह करुन ठेवण्यास गुगलने परवानगी दिली आहे.

काय आहे नेमका बदल?

व्हॉट्सअॅपमध्ये युजर्स एकमेकांना फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ अशा फाईल्स पाठवतात. या फाईल व्हॉट्सअॅपच्या फोल्डरमध्ये म्हणजेच पर्यायाने मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह व्हायच्या. हा डेटा आपल्याला गरज असेल त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये मिळायचा. मात्र आता हा डेटा व्हॉट्सअॅपच्या फोल्डरमध्ये सेव्ह होणार नाही. हा संपूर्ण डेटा आता गुगल ड्राइव्हमध्ये सेव्ह होणार आहे. या आधी व्हॉट्सअॅपकडून युजर्सना बॅकअपची विचारणा केली जायची किंवा ऑटोमॅटिक बॅकअपचा पर्याय समोर यायचा. मात्र आता हा पर्याय समोर येणार नाही.

- Advertisement -

डेटामुळे मोबाईलची मेमरी फुल

व्हॉट्सअॅपचा डेटा मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह व्हायचा. या व्हॉट्सअॅपच्या डेटामुळे मोबाईलची मेमरी फुल व्हायची. मात्र आता हा डेटा मोबाईलमध्ये सेव्ह न होता गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होणार आहे. त्यामुळे आता मोबाईलची मेमरी देखील फुल होणार नाही.

असा घ्या बॅकअप

  • प्रथम तुमचे गुगल अकाऊंट अॅक्टिव्हेट करा.
  • त्यानंतर त्यात गुगल ड्राईव्ह सेटअप इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर व्हॉट्स अॅप सुरु करुन सेटिंग्समध्ये जा आणि चॅट बॅकअप पर्याय शोधा.
  • बॅकअपवर क्लिक केल्यास गुगल ड्राईव्हमध्ये ऑटोमॅटिक बॅकअप तुम्हाला मिळेल.

वाचा – व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर; अॅडमिन ‘फुल अधिकारी’!

- Advertisement -

वाचा – आता फक्त ५ जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -