गुगलनंतर व्हॉट्सअॅपही फेक न्यूज विरोधात

गुगल आणि फेसबुक नंतर आता व्हॉट्सअॅपही फेकन्यूज विरोधात जनजागृती करणार आहे. या नुसार व्हॉट्सअॅप पहिल्यांदाच जाहिरातींचा आधार घेणार आहे.

Mumbai
whatsapp icon
प्रातिनिधिक फोटो

सोशल मीडियाचा वाढता वापर याचे अनेक फायदे असले तरी तोटेही आहे. नाण्यांच्या दोन बाजू असतात याच प्रमाणेच सोशल मीडियाच्याही दोन बाजू आहे. अनेकदा सोशल मीडियाचा वापर खोट्या बातम्या(फेक न्यूज) पसवण्यासाठी वापरला जातो. फेकन्यूजचा वापर जनतेचे मत परिवर्तनासाठी केला जातो. अनेकदा या व्हिडियाचे वापर करुन लोकांनाच्या भावनाही दूखावण्यात येतात. आपल्या माध्यमांचा गैर वापर होतो हे आता कंपन्यांना कळून चूकले आहे. यासाठी आता सोशल मीडियातील मोठ्या कंपन्या एकजूट होऊन फेक न्यूज विरोधात एक मोहीम राबवत आहेत. फेक न्यूज कशा पद्धतीने थांबवता येतील यावर त्यांनी विविध कार्यशाळांचे आयोजन केले आहे. गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांनी मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागृकता यावी यासाठी प्रयत्न केले. यामध्ये आता व्हॉट्सअॅपचाही समावेश झाला आहे. व्हॉट्सअप टीव्हीवर जाहीराती करून लोकांमध्ये फेक न्यूज बद्दल जाहिराती करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपवर का आली जाहिरात करण्याची वेळ?

व्हॉट्सअॅप ही एक मोठी मॅसेजिंग सेवा आहे. जगभरात व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेकदा व्हॉट्सअॅपचा वापरकरून अनेकदा फेक न्यूज पाठवल्या जातात. या फेकन्यूज कोणी तक्रार केल्याशिवाय ट्रेस होत नाहीत. म्हणून व्हॉट्सअॅप आता टिव्हीवर जाहीरात करणार आहे. ही जाहीरात भारतात इंग्रजी, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू, आसामी, गुजराती, मराठी आणि मल्याळम या भाषांमध्ये केली जाणार आहे.

काय असणार या जाहीरातीत

व्हॉट्सअॅपचा काळजी पूर्वक वापर करावा यासाठी टिव्हीवर साठ सेकंदाची जाहीरात दाखवली जाणार आहे. ही जाहीरात फेक न्यूजचे दुष्परिणाम यावर आधारित असणार आहे. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याामुळे सोशल मीडियाचा वापर वाडतो आहे. अशामध्ये फेक न्यूज पसरवण्याचा धोकाही वाढतो. २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या निवडणूकीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. असे भारतात होऊ नये याची काळजी घेतली जाते आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here