घरUncategorizedबलात्कारावेळी अल्पवयीन होता म्हणून आरोपीची २० वर्षांनी सुटका!

बलात्कारावेळी अल्पवयीन होता म्हणून आरोपीची २० वर्षांनी सुटका!

Subscribe

२० वर्षांपूर्वी घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात एका आरोपीला अल्पवयीन असल्याने सोडून देण्यात आल्याची घटना मुंबईत घडली आहे. कवळेवाडी परिसरात १९९६साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी बलात्कार करणारा आरोपी अल्पवयीन होता. तसेच अल्पवयीन आरोपीला कायद्यानुसार ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा देता येत नाही जी सदर आरोपीने आधीच भोगली होती. त्यामुळे त्याची मुक्तता करण्याचा निर्णय मुंबई न्यायालयाने दिला आहे.

ज्याला त्याला त्याच्या कर्माची फळे याच जन्मात भोगून जायची असतात असे म्हणतात. पण याला तडा देत बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करूनही तब्बल २० वर्षांनी एका बलात्काऱ्याला कोर्टाने सोडून दिले आहे. त्यामुळे २० वर्ष चाललेल्या या खटल्यात अखेर बलात्कार पीडितेला न्याय मिळाला नाहीच, असा सूर मात्र उमटला आहे.

नेमकी काय होती घटना?

३० जानेवारी ते १० फेब्रुवारी १९९६ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या कवळेवाडीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर श्रीकृष्ण मराठे याने दोनवेळा बलात्कार केला. त्यानंतर काही महिन्यांतच या मुलीचे पोट मोठे दिसू लागले. म्हणून तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. तेथे तपासणीनंतर ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे कळाले. हे कळताच या मागे श्रीकृष्णचा हात असल्याचे कळले आणि त्यांनी थेट श्रीकृष्णचे घर गाठले. श्रीकृष्णने आपल्या मुलीसोबत लग्न करावे अशी मागणी त्या मुलीच्या घरातल्यांनी करताच श्रीकृष्णच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला. त्यामुळे बलात्काराच्या सात महिन्यांनंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

- Advertisement -

२० वर्षांनंतर खटला निकाली

बलात्काराची घटना घडली तेव्हा आरोपीचे वय १८ वर्षांहून कमी होते. त्यामुळे तो गुन्हा करुनही बालगुन्हेगार असल्याने त्याला मिळालेली कारावासाची शिक्षा अपिलानंतर रद्द करण्यात आली. बालगुन्हेगारी कायद्यानुसार आरोपीला तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा दिली जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे अटक झाल्यापासून श्रीकृष्णने तीन वर्षांहून अधिक काळ कारावास भोगला. हे लक्षात घेत त्याची शिक्षा रद्द केली गेली. त्यानंतर खटला उभा राहिला. यात त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. कोर्टात प्रवीणच्या बचावासाठी तो बालगुन्हेगार असल्याचे पुरावे दाखल करण्यात आले. सत्र आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला बालगुन्हेगार न मानता त्याला शिक्षा दिली. त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर तो गुन्ह्यावेळी १८ वर्षांचा होता यावर शिक्कामोर्तब करुन त्याची शिक्षा रद्द करण्यात आली.

आता ते मूल २१ वर्षांचे 

बलात्कारानंतर ही मुलगी गरोदर राहिली होती. तिला झालेले अपत्य आता २१ वर्षांचे आहे. मात्र दरम्यानच्या काळात श्रीकृष्ण आणि त्या मुलीचे इतर कोणाशी लग्न झाले की नाही, या बद्दल काहीच माहिती समोर आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -