घरट्रेंडिंगबापरे! तब्बल १२०० रुपयांना विकली जाते 'ही' भाजी!

बापरे! तब्बल १२०० रुपयांना विकली जाते ‘ही’ भाजी!

Subscribe

बातमीचे हेडिंग वाचून तुम्हाला ती भाजी नेमकी कोणची हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल हे नक्की… ही बहुधा देशातील सर्वात महाग भाजी असावी. ते फक्त सावन महिन्यात विकले जाते असे देखील सांगितले जाते. तेही झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यांतच.. त्याभाजीचे नाव दोन्ही ठिकाणी भिन्न आहे. खुखडी (Khukhadi) असे या भाजीचे नाव असून त्याची किंमत १२०० रुपये प्रति किलो आहे. पण बाजारात येताच ही भाजी लगेच विकली जाते. या भाजीमध्ये प्रथिने भरपूर असल्याचे सांगितले जाते.

छत्तीसगडमध्ये त्याला खुखडी म्हणतात तर झारखंडमध्ये याला रुगडा असे म्हणतात. हे दोन्ही मशरूम भाजीचीच एक प्रजाती आहेत. ही भाजी खुखरी (मशरूम) आहे, जी जंगलात नैसर्गिकरित्या वाढते. ही भाजी दोन दिवसात शिजवावी लागते, अन्यथा ती निरुपयोगी ठरते. बलरामपूर, सूरजपूर, सुरगुजा, छत्तीसगडसह उदयपूरला लागून कोरबा जिल्ह्यातील जंगलात पावसाळ्याच्या दिवसात नैसर्गिक खुखड़ी ही भाजी येते.

- Advertisement -

दोन महिन्यांपर्यंत वाढणाऱ्या खुखरीची मागणी इतकी वाढते की जंगलात राहणारे ग्रामस्थ ते साठवून ठेवतात. छत्तीसगडमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागात ही भाजी कमी किंमतीत विकत घेऊन ती १००० ते १२०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो विकतात. या हंगामात दररोज अंबिकापूर बाजारात सुमारे पाच क्विंटल या भाजीचा पुरवठा होतो. खुखरी हा पांढर्‍या मशरूमचा एक प्रकार आहे. खुखडीच्या अनेक प्रजाती व वाण आहेत. लांब पट्ट्यातील सोरवा खुखडीला जास्त पसंती असते. त्याला भूडू खुखडी असे म्हणतात. भुडू हे मातीचे घर किंवा टेकडी असून जिथे ही भाजी पावसात वाढते. ही भाजी शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते.

पवित्र सावन महिन्यात झारखंडची मोठी लोकसंख्या महिनाभर चिकन आणि मटण खाणे बंद करते. अशा परिस्थितीत दुर्गम भागातून येणारी खुखडी हा चिकन आणि मटणसाठी चांगला पर्याय आहे. रांचीमध्ये ही भाजी प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये दराने विकली जाते. भाजीशिवाय औषधे बनवतानाही याचा उपयोग होतो. असे सांगितले जाते की पावसाळ्यामध्ये वीज कोसळल्याने जमिनीच्या आतून पांढऱ्या रंगाची खोखडी बाहेर येते. गुरेढोरे पाळणाऱ्या मेंढपाळ खुखडीची चांगली पारख करतात. खुखडी कोठे सापडेल हेदेखील त्यांना ठाऊक असते.


आता भारतात गाढविणीचं दूध उत्पादन; १ लिटरची किंंमत ऐकून थक्क व्हाल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -