घरताज्या घडामोडीसुधीर भाऊ चांगला विनोद करता, कार्यक्रम ठेवला तर लोकांची गर्दी होईल -...

सुधीर भाऊ चांगला विनोद करता, कार्यक्रम ठेवला तर लोकांची गर्दी होईल – राऊत

Subscribe

सुधीर मुनगंटीवार यांच्या भविष्यवाणीवर संजय राऊत यांनी लगावला टोला

भाजपचे आमदारसुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकार जास्तीत जास्त तीन महिने टिकेल, त्यानंतर भाजप सत्तेत येईल, अशी भविष्यावाणी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मुनगंटीवारच्या भविष्यावाणीने चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांना खलनायकांची उपमा देऊन टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार चांगला विनोद करतात, त्यांनी जर एखादा विनोदी कार्यक्रम ठेवला तर लोकं चांगलीच गर्दी करतील, असा राऊतांनी टोला लगावला आहे.

संजय राऊत पत्रकारांनी बोलताना म्हणाले की, ‘विरोधी पक्षाने पुढील साडे तीन वर्ष आपली भूमिका उत्तम प्रकारे बजावावी. सुधीर भाऊंनी सांगितलंय तीन महिन्यात सरकार येईल. ते चांगला विनोद करतात. लवकरच थिअटर्स सुरू होतायत. मला प्रमुख नाट्यनिर्मात्यांचा फोन होता. त्यांना काही कन्सेक्शन हवंय. पण मला काही गरज वाटत नाही. सुधीर भाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवलेतर लोक गर्दी करतील.’

- Advertisement -

‘ सरकार पुढीस साडेतीन वर्ष अत्यंत मजबूतीने काम करेल. सुधीर भाऊंनी किंवा भारतीय जनता पक्षाने जास्त चिंता करू नये. ते विरोधी पक्षाची उत्तर भूमिका पार पाडतायत. त्यांनी त्या भूमिकेत कायम राहावं. कधी कधी खलनायक सुद्धा सिनेमा पुढे घेऊन जातो. नायकाबरोबर खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमे पाहायचो, तेव्हा प्राण, शक्ती कपूर , अमरीश पुरी, निळू फुले, राजेश शेखर यांच्यावर सुद्धा सिनेमे चालत होते. महाआघाडी असल्यामुळे हा महासिनेमा आहे, त्यामुळे असे कलाकार असतात. सुधीर भाऊंसारखे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार या सगळ्या पात्रांनी आपापल्या भूमिका पार पाडल्या आहेत. पण महाराष्ट्रात पुढील साडेतीन वर्ष हे वातावरण खेळीमेळीचं, हसतखेळत जाईल,’ असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – सामनात अग्रलेख आला म्हणजे आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला – फडणवीस

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -