घरताज्या घडामोडीcruise drug case : एनसीबीच्या वसुलीमध्ये अनेकांचा हात असण्याची शक्यता, जयंत पाटलांची...

cruise drug case : एनसीबीच्या वसुलीमध्ये अनेकांचा हात असण्याची शक्यता, जयंत पाटलांची शंका

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईमध्ये समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. यामध्ये आर्यन खानच्या अटकेमध्ये असलेला पंच फुटला असून त्याने समीर वानखेडे यांनी २५ कोटींची मागणी शाहरुख खानकडे केली असल्याचा आरोप केला आहे. यामुळे एनसीबीच्या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे. हे प्रकरण फार गंभीर असून यामध्ये अनेक लोकांचा समावेश असण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका व्यक्त केली आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची मागणी केली असल्याचा दावा या प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साहील याने केला आहे. या प्रकरणावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हे प्रकरण फार गंभीर आहे. केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करत आहे. एजन्सीकडून पैसे वसुली करण्याचे काम करण्यात येत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. क्रूझवर कारवाई करुन अटक करण्यामध्ये भाजपचे लोकं पुढे दिसत होते. आता पैशाची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी लोकं सहभागी असल्याची शक्यता आहे. अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये ते ड्रग्ज कोणी ठेवले? ड्रग्ज प्रकरणातील कारवाईमध्ये किती सत्य आहे? यामध्ये आता पैशाची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण फार गंभीर असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

एसआयटीमार्फत चौकशी करा

आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची मागणी केली असल्याचा दावा या प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साहील याने केला आहे. किरण गोसावी याचा सुरक्षा रक्षक असलेल्या प्रभाकर साहीलने व्हिडिओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे. यामध्ये आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु १८ कोटी रुपयांवर डील झाली त्यातील ८ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांना भेटणार होते. असा खुलासा प्रभाकरने केला आहे. या व्हिडिओमुळे आता राजकीय वर्तुळातही वातावरणं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून वसूली सुरु असल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आणखी वसुली करण्यात आली आहे. हा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच या सर्व प्रकाराची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठकारे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मलिकांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  Cruise Drugs Case: प्रभाकर साईलच्या खंडणी आरोपात काही तथ्य नाही – NCB


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -