घरताज्या घडामोडीबाळासाहेबांनी दहशतवाद्यांनाही अल्टीमेटम दिला होता, अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त... राज ठाकरेंना संजय...

बाळासाहेबांनी दहशतवाद्यांनाही अल्टीमेटम दिला होता, अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त… राज ठाकरेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Subscribe

महाराष्ट्रातील सर्व मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढा असा अल्टीमेटम काल, मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत महाविकास आघाडी सरकारला दिला. राज ठाकरेंच्या या अल्टीमेटवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘देशात आणि महाराष्ट्र अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेब ठाकरेंनी या देशातील अतिरेक्यांना अल्टीमेटम दिला होता. मग अमरनाथ यात्रा असेल, वैष्णवदेवी यात्रा असेल मग इतर काही दहशतवादी कारवाया असेल. अल्टीमेटम देण्याची कुवत फक्त हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती. हा भाजपचा भोंगा आहे.’

‘दीड वर्ष मनसेचा भोंगा होता बंद’

‘कालचा भाजपचा भोंगा आहे. ईडी कारवाईबाबत भाजपने त्यांना सूट आणि अभय दिल्यानंतर हा भोंगा सुरू झाला आहे. दीड वर्ष या पक्षाचा भोंगा बंद होता. हिंदुत्वाबाबत आम्हाला शिकवण्याची गरज नाही. शिवसेनेच्या रक्तात आणि रगारगात हिंदुत्व वाहते. जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला होता, त्यावेळेस भाजप आणि भाजपचे हे नवे भोंगे नव्हते. आम्ही होतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना हिंदुत्वासाठी संघर्ष करत आली. यामध्ये आमच्या लोकांचा जीव गेला. त्यामुळे ही कालची गोष्ट सोडा, रात्र गई बात गई. दिवा जेव्हा विझतो तेव्हा विझण्यापूर्वी तो मोठा होतो, असे मी कालच म्हणालो होतो. राजकारणात याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. जे लोकं महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या आमने-सामने येऊन लढू शकत नाहीत, ते लोकं असा मार्ग निवडतात,’ असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.

- Advertisement -

‘ईडी कारवाईबाबत अभय मिळाल्यामुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय’

पुढे राऊत म्हणाले की, जे आमच्याशी थेट लढू शकत नाही, ते अशाप्रकारचे भोंगे लावून माहोल निर्माण करतायत. जे कालपर्यंत ईडी, ईडी, ईडी कथक करत होते. त्यांना केंद्राकडून ईडीच्या कारवाईबाबत अभय मिळाल्यामुळे हा भोंगा वाजतोय. आम्ही खोट्या कारवांयाबाबत सामोर जातोय, लढतोय. त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, मिमिर्की करा, आमच्या विषयी खोटं बोला. तरीही शिवसेना आणि महाविकास आघाडी भक्कम, मजबूत आहे. एका वैफल्यातून आणि निराशेतून अशा प्रकारचे भोंग वाजतायत. भाजपने आमच्या विरोधात जे भोंगे वाजवले त्याचा उपयोग झाला नाही, म्हणून नवीन भोंगे लावले. त्याच्याही काही उपयोग होणार नाही.

‘शिवराळ भाषेचे कौतुक व्हायला पाहिजे’

‘खरं म्हणजे मी ज्या संदर्भात जी शिवराळ भाषा वापरली आहे. त्या शिवराळ भाषेचे काल कौतुक व्हायला पाहिजे होते. कारण कालपर्यंत ते मराठी अभिमानी म्हणून मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे, आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्याच्यामुळे माझ्या काल शिवराळ भाषेचे त्यांनी अभिनंदन केले असते किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता, तर काल त्यांचे मराठीप्रेम दिसले असते,’ असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

‘महाराष्ट्र आणि मुंबईला तोडण्याचे सोमय्यांनी बनवले प्रेझेंटेशन’

पुढे राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या शिवराळ भाषा वापरली, त्याबद्दल मला आणि शिवसेनेला त्याचा गर्व आहे. याविषयावर माझी आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. किरीट सोमय्यांना शिवराळ भाषा का वापरली? याचा जर अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून त्यांना माझी वेदना समजून घेतला आली असती. हाच किरीट सोमय्या ज्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये म्हणून महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कोर्टात गेला होता, त्याच्या विरोधात मी शिवराळ भाषा वापरली आहे. हाच किरीट सोमय्या आणि त्याचे इतर काही बिल्डर्सने मिळून महाराष्ट्र आणि मुंबई तोडण्याचे प्रेझेंटेशन केले आहे. मी हे बोललोय आणि दिल्लीच्या वृत्तपत्रातही सुतोवाच झालेला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडावी, मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार असून नये यासाठी प्रेझेंटेशन या लोकांनी तयार केली आहे. हे सतत दिल्लीत जाऊन गृह खात्यात लॉबिंग करतायत.’

‘सोमय्याला शिवतीर्थावर बोलावून सत्कार करा’  

‘मुंबई महाराष्ट्रापासून तुडावी, मुंबईवर महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अधिकार असू नये याबाबत त्यांची कारस्थान सुरू आहेत. याचा सुत्रधारसुद्धा किरीट सोमय्या आणि भाजप संबंधित काही बिल्डर्स आणि उद्योगपती आहेत. हे जेव्हा मला समजले तेव्हा संतापून माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली असेल. मी त्याला शिवी म्हणत नाही, ही त्याची लायकीच आहे. मला मराठी जनता त्या शिवीबद्दल माफ करेल आणि उत्तेजन देईल. हा एका मराठी माणसाच्या तोंडातून शिवसैनिकांच्या तोंडातून निघालेला अंगार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरीट सोमय्यांनी मराठी विरोधात भूमिका घेतली आहे आणि मुंबई तोडण्यासंदर्भातील प्रेझेंटेशन दिल्लीत सादर केलेय. त्याचे समर्थन तुम्ही करणार असाल, तर ठीक आहे. माझ्या शिवराळ भाषेवर जरूर टीका करा. मग तुमची भूमिका बदलली असेल तर सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा,’ असे राऊत म्हणाले.


हेही वाचा – राज ठाकरेंना फार महत्त्व देऊ नका, योग्य वेळी उत्तर देणार – अजित पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -