घरपालघरलग्न रद्द झाल्याने मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्रिकेत शैक्षणिक पात्रता न लिहिल्याने मुलाचा...

लग्न रद्द झाल्याने मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्रिकेत शैक्षणिक पात्रता न लिहिल्याने मुलाचा नकार

Subscribe

सिव्हिल इंजिनीअर असलेल्या वधू पक्षाकडून वरपक्षाची शैक्षणिक पात्रता लग्नपत्रिकेत लिहिली नसल्याने २५ एप्रिल रोजीचे ठरलेले लग्न रद्द केल्यामुळे नववधूने तिच्या पालघरच्या फ्लॅटमध्ये विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

सिव्हिल इंजिनीअर असलेल्या वधू पक्षाकडून वरपक्षाची शैक्षणिक पात्रता लग्नपत्रिकेत लिहिली नसल्याने २५ एप्रिल रोजीचे ठरलेले लग्न रद्द केल्यामुळे नववधूने तिच्या पालघरच्या फ्लॅटमध्ये विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पालघर पोलिसांनी नियोजित वर व त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला असून हे तिघेही फरार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू भोये यांनी सांगितले. सिव्हिल इंजिनीअर असलेली ही मुलगी आणि विरारच्या एका नामांकित फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर असणाऱ्या या मुलाची २०१८ मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. पुढे प्रेमसंबंध जुळल्यानंतर २५ एप्रिल रोजी त्यांचे पालघरजवळील एका रिसॉर्टमध्ये लग्न होणार होते. मात्र, १९ एप्रिल रोजी परंपरेनुसार वाग्दत्त वधूचे वडील आणि आई वराच्या घरी त्याच्या आईवडिलांना पहिली निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेले असता, वराच्या नावापुढे त्यांची शैक्षणिक पात्रता पत्रिकेत लिहिली नसल्याने वराला संताप आला. तसेच, विधीसाठी इव्हेंट मॅनेजर म्हणून कार्डमध्ये तिच्या कौटुंबिक मैत्रिणीच्या नावावरही त्याने आक्षेप घेतला, असे तक्रारकर्त्याने सांगितले.

भेटीसाठी बोलावले आणि त्यादरम्यान त्याने तिला अटी व शतींची मोठी यादी दिली. त्यानंतरच तो तिच्याशी लग्न करेल, असे म्हणत या मुलाने लग्नाला नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, मुलाच्या आई-वडिलांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. लग्नाला नकार आल्याने २२ एप्रिल रोजी पीडितेने तिच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला पालघर पोलीस तक्रार स्वीकारत नव्हते म्हणून वधूच्या कुटुंबियांनी एकता सामाजिक कल्याण मंचाच्या सदस्या शमीम शेख यांच्याशी संपर्क साधला आणि त्या स्वतः पालघर पोलीस ठाण्यात गेल्या. त्यानंतर शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बलात्कार, फसवणूक, आत्महत्येला प्रवृत्त करणे, दुखापत करणे आदी कलमान्वये वाग्दत्त वर आणि त्याचे आई-वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

नवनीत राणांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांनी घेतली दखल, २४ तासांत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -