घरताज्या घडामोडीRajya Sabha Elections 2022: शायद मेरी तपस्या में कुछ..,राज्यसभेची उमेदवारी डावलताच काँग्रेस...

Rajya Sabha Elections 2022: शायद मेरी तपस्या में कुछ..,राज्यसभेची उमेदवारी डावलताच काँग्रेस नेत्यानं ट्विट करत व्यक्त केली नाराजी

Subscribe

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2022) प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणुका पार पडत आहेत. अशातच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. परंतु पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावं या यादीत नसल्याने आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली असून राजस्थानमधून दिलेल्या उमेदवारांच्या नावावर आणखी प्रश्न निर्माण होत आहेत. राजस्थानमधून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार राजस्थानचे नाहीयेत. मात्र, या नावांची घोषणा करण्यात आली असून राजस्थानच्या सिरोहीचे काँग्रेस आमदार संयम लोढा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

राजस्थानमधून कोणालाही उमेदवारी का दिली नाही, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, अशातच राज्यसभेची उमेदवारी डावलताच काँग्रेस नेत्यानं ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा देखील नाराज असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी उणीव असेल, अशा प्रकारचं ट्विट पवन खेरा यांनी केलं आहे. कारण पवन खेरा हे मूळ राजस्थानचे असून ते काँग्रेसचे राज्यसभेचे दावेदार होते. मात्र, त्यांचे नाव या यादीमध्ये नाहीये, त्यामुळे यादी जाहीर केल्यानंतर त्यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीसह भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा : काँग्रेसकडून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढि उमेदवार, मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -