घरCORONA UPDATEराज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका वाढला, मास्कबाबत टोपेंनी केले महत्त्वाचे विधान

राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका वाढला, मास्कबाबत टोपेंनी केले महत्त्वाचे विधान

Subscribe

एका आठवड्यात पालघरमध्ये ३५० टक्के रुग्ण वाढले असून ठाण्यात १९२ टक्के रुग्णांची वाढ झाली आहे. तर, मुंबईत १३५ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढ झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, राज्यात तुर्तास मास्कसक्ती करण्यात येणार नसली तरीही गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावा असे आवाहनही करण्यात आले आहे. (Threat of corona increased in six districts of the maharashtra, health minister Rajesh Tope made important statements about masks)

एका आठवड्यात पालघरमध्ये ३५० टक्के रुग्ण वाढले असून ठाण्यात १९२ टक्के रुग्णांची वाढ झाली आहे. तर, मुंबईत १३५ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. रायगड, पुणे जिल्ह्यातही १३५ टक्के वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. १०० टक्क्यांहून अधिक रुग्णवाढ नोंदवण्यात येत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका संभवत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

वाचा – मुंबईच्या ‘या’ परिसरात कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ

चाचण्या वाढवण्याचे आदेश

- Advertisement -

रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचे (Increasing in testing) आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. ताप, सर्दी, खोकल्यासारखे लक्षण आढळल्यास कोरोना चाचणी करण्याचे सांगण्यात आले असून सध्या दिवसभरात २५ हजार चाचण्या होत असल्याची माहिती टोपेंनी दिली.

हेही वाचा चिंताजनक! ‘या’ देशात वाढतोय मंकीपॉक्सचा प्रसार

रुग्णवाढीचा दर वाढला

राज्यात आठवड्यातभरात ४.७१ टक्के रुग्णवाढीचा दर (Poisitve Rate) होता. तर, मुंबईत ८.८२ टक्के, पालघरमध्ये ४.९२ टक्के, ठाण्यात २० टक्के रुग्ण वाढीचा दर आहे. रुग्णवाढीचा दर वाढल्याने राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patients) संख्याही वाढली आहे. राज्यात सध्या ७ हजार ४२९ रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी एकट्या मुंबईत ५ हजार २३८ रुग्ण आहेत.

गंभीर रुग्णांची संख्या कमी

रुग्णवाढ होत असताना रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी मुंबईत ५४ रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २१९ झाली आहे. संपूर्ण राज्यभरात २५४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी केवळ १.०४ टक्के रुग्ण म्हणजेच ६१ रुग्ण गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर, तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचंही सांगण्यात आलं. उर्वरित ९६ टक्के रुग्ण लक्षणविरहीत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -