घरराजकारणविधानसभा अध्यक्ष निवडणुकीत 12 सदस्य अनुपस्थित, सर्वाधिक राष्ट्रवादीचे

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत 12 सदस्य अनुपस्थित, सर्वाधिक राष्ट्रवादीचे

Subscribe

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सहजपणे जिंकून एकनाथ शिंदे सरकारने सहज विजय नोंदविला आहे. भाजपाचे पाठबळ या एकनाथ शिंदे यांना असल्याने या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. पण या प्रक्रियेत 12 आमदार अनुपस्थित होते आणि त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त आहे.

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आधीच्या ठाकरे सरकारला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यास परवानगी नाकारली होती, मात्र नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारला ही निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने-सामने होते.

- Advertisement -

हेही वाचा – …आता जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांच्या भाषणात हशा आणि टाळ्या

राहुल नार्वेकर हे 164 मते मिळवून विजयी झाले. तर, राजन साळवी यांना 107 मते मिळाली. मनसेचे आमदार राजू पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह तीन आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले. तर, समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूमुळे विधानसभेतील ती जागा रिक्त आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीते सात आमदार या निवडणूक प्रक्रियेच्यावेळी अनुपस्थित होते. त्यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख कारागृहात आहेत, तर निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे आणि अण्णा बनसोडे हे अनुपस्थित होते. तर, आजारपणामुळे भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघे या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि जितेश अंतापूरकर तसेच एमआयएमचे मुफ्ती इस्माइल शाह हे अनुपस्थित होते. तसेच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदान केले नाही.

हेही वाचा – कायद्यातील निष्णात असलेले अध्यक्ष कायदेमंडळाला मिळाले – देवेंद्र फडणवीस

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -