घरताज्या घडामोडीबेकायदेशीर प्रवक्त्याचे शरद पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे - महेश तपासे

बेकायदेशीर प्रवक्त्याचे शरद पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे – महेश तपासे

Subscribe

बेकायदेशीर शिंदेसरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर यांचे शरद पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  शरद पवारांवर दीपक केसरकर यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे तर शरद पवारांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचे महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दीपक केसरकर यांना माहीत नसावी असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही महेश तपासे यांनी दीपक केसरकर यांना करुन दिली आहे.

जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी शरद पवारांनी शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. हे दीपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत, असेही महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ठाकरेंना बोलू नका; किशोरी पेडणेकरांकडून केसरकरांना सुनावले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -