घरट्रेंडिंगपुण्यात ट्रेकिंगला जाताय? गड-किल्ल्यांवर जमावबंदी लागू, जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली सादर

पुण्यात ट्रेकिंगला जाताय? गड-किल्ल्यांवर जमावबंदी लागू, जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली सादर

Subscribe

पावसामुळे गड-किल्ल्यावंरील अनेक रस्ते निसरडे झाले आहेत, त्यामुळे अपघातांची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर, धबधबे-धरण परिसरात उत्साही पर्यटकांमुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा पर्यटनस्थळांवर निर्बंध लादले आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान, राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने पुण्यातील गडकिल्ले, धरण, तलाव आणि धबधबे परिसरात १७ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Going trekking in Pune? Curfew imposed on forts, rules submitted by District Collector)

हेही वाचा – खवळलेल्या समुद्राने गिळलं कुटुंब! सांगलीतील एकाच कुटुंबातील पित्यासह दोन मुलं ओमनच्या समुद्रात गेली वाहून

- Advertisement -

राज्यात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पावसामुळे गड-किल्ल्यावंरील अनेक रस्ते निसरडे झाले आहेत, त्यामुळे अपघातांची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर, धबधबे-धरण परिसरात उत्साही पर्यटकांमुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा पर्यटनस्थळांवर निर्बंध लादले आहे.

हेही वाचा – मुंबईकरांनो आता पाणी कपातीचं नो टेन्शन! मोडक सागर तलाव भरून वाहू लागला

- Advertisement -

या ठिकाणी असतील निर्बंध?

  • हवेली – सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक
  • मावळ – किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधी वरेखिंड, पवना परिसर
  • मावळ – राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर
  • मुळशी – अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड
  • भोर – रायरेश्वर किल्ला
  • वेल्हा – किल्ले राजगड, किल्ले तोरण, पाणशेत धरण, मढेघाट
  • जुन्नर – किल्ले जीवधन
  • आंबेगांव – बलीवरे ते पदरवाडी, भीमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट, गणपती मार्गे)

हेही वाचा – नागपूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, नवेगाव खैरी धरणाचे उघडले १६ दरवाजे

काय आहेत निर्बंध?

  • जमावबंदी कायद्यानुसार कोणत्याही पर्यटनस्थळावर पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र राहू शकणार नाहीत.
  • पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणी, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
  • नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास मनाई आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, मद्य उघड्यावर सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
  • वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे या बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या आणि थर्माकॉलचे आणि प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर आणि इतरत्र फेकणे, मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टिम वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणीतीही कृत्ये करण्यास मनाई आहे.
  • धबधबाच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश नसेल.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -