घरताज्या घडामोडीशिवसेनेचे तुकडे करून दाखवाच, संजय राऊतांचं आव्हान

शिवसेनेचे तुकडे करून दाखवाच, संजय राऊतांचं आव्हान

Subscribe

महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरावर पहारे ठेवण्यात येत आहेत. ५० आमदारांच्या घरावर महाराष्ट्रातील पोलीस फाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. आता खासदारांच्या घरावरही पहारे देण्यात येत आहेत. पोलीस बळ, केंद्रीय यंत्रणा आणि पैशांचा वापर होत असलातरी जे होईल ते पाहून घेऊ. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष आणि सामना करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे. महाराष्ट्रासह शिवसेनेचे सुद्धा तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचे तुकडे करून दाखवाच, असं आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटाला दिलं आहे.

शिवसेनेचे तुकडे करून दाखवाच…

संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, लढाई चिन्हाची किंवा पक्षाची असली तरी आम्ही दोन हात करण्यास तयार आहोत. ज्यापद्धतीने छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, हे भाजपचे नेतेच सांगत आहेत. अखंड महाराष्ट्र तोडायचा आहे. हे भारतीय जनता पक्षाचे नेते जाहीरपणे बोलत आहेत. महाराष्ट्रासह शिवसेनेचे सुद्धा तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर त्याआधी शिवसेनेचे तुकडे करा. अखंड शिवसेना फोडा. शिवसेनेची ताकद कमी करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर आणि पक्षावर निवडून आलेले आमदार, खासदार हे आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सर्व परिस्थितीतून पुन्हा उभी राहील. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी आणि पहारे लागले आहेत. त्यांना कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करू, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री दिल्लीत जरी आले असले तरी ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड येथे आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना येथे यावं लागेल. मनोहर जोशी, नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना ते दिल्लीत कधी आल्याचं मला माहिती नाही. कारण सर्व प्रकारच्या चर्चा या मुंबईतच होत होत्या. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्याचे प्रश्न घेऊन दिल्लीत यावं लागतं. पण सरकार स्थापनेसाठी किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन जर ते दिल्लीत आले असतील तर महाराष्ट्र डोळेवर करून बघेल, असं राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे दिल्लीत आले होते. सोनिया गांधींना ठाकरेंनी भेटल्याबाबत फोटो व्हायरल केले जात आहेत. परंतु उद्धव ठाकरे पंतप्रधान आणि शहांना सुद्धा भेटले होते. मग ते फोटो का व्हायरल केले जात नाहीत, दिल्लीत येऊन त्यांनी सर्व नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना भवन ताब्यात घेणार का?

शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने व्यवस्था करून ठेवल्या आहेत. त्या व्यवस्थेनुसार हे चालतं. त्यांना महाराष्ट्रासह शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील आम्ही मातोश्रीत जातो. यांचा काहीही भरोसा नाही. सत्तेची भांग प्यायलेली माणसं काहीही करू शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केलीच नाही, असंही हे उद्या बोलू शकतात. यांची वैचारीक पातळी उंचावली आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. फक्त लोकांनी भ्रमीत करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात होणार आहे. न्यायालयात दबाव टाकण्याचा जरी प्रयत्न झाला तरी आजही सर्वोच्च न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रसेवा घडेल, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : पंतप्रधानांबद्दल अपशब्द म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, अलाहाबाद हायकोर्टाने


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -