घरताज्या घडामोडी'त्यांच्या'वर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला

‘त्यांच्या’वर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला

Subscribe

एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदार सुप्रीम कोर्टात अपात्र ठरतील आणि राज्यात पुन्हा सत्तांतर होईल, असा दावा करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीसांनी राऊतांचा नामोल्लेखही टाळला. संजय राऊतांवर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना लगावला आहे.

त्यांच्यावर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा संजय राऊतांनी राज्यात पुन्हा सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारची विधानं ते करत आहेत, त्यावरून ते किती भाबडे आहेत हे दिसून येते. ते दिवसातून कितीवेळा बोलतात. त्यांच्यावर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं आहे. त्यांच्यावर बोलण्यासाठी आमच्या पक्षाचे छोटे प्रवक्ते आहेत, त्यांना तुम्ही याविषयी विचारा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

आमचं मंत्रिमंडळ लवकरच स्थापन होईल

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला झालेल्या विलंबावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. ज्या लोकांनी ३२ दिवस पाच लोकांचे सरकार चालवले त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचं मंत्रिमंडळ लवकरच स्थापन होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

राज्यात पूरपरिस्थिती आणि ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे सरकार लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देईल. तुमच्या सरकारसारखं आमचं सरकार नाही, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतीचे ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये रोज १० टक्क्यांची वाढ होत आहे. येत्या आठवडाभरात १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर आमचे सरकार शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करेल, असंही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करा, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -