घरमनोरंजनव्ही आर प्रेग्नेंट म्हणत 'मुंबई-पुणे-मुंबई ३' चा ट्रेलर लाँच

व्ही आर प्रेग्नेंट म्हणत ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ चा ट्रेलर लाँच

Subscribe

'मुंबई-पुणे-मुंबई ३' चा ट्रेलर लाँच झाला असून हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा स्वप्नील आणि मुक्ताची जोडी त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

मुंबई – पुण्यासाठी त्या दोघांची भांडण सगळ्यांना हवीहवीशी वाटतात, अशी जोडी म्हणजे गौतम आणि गौरी. पुणे की मुंबई असा वाद घालणारे अखेर ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांची प्रेम कहाणी सांगणारा ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या चित्रपटाचा आता तिसरा भाग ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या गोड जोडीचा पुढचा भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मराठीत पहिल्यांदा चित्रपटाचा तिसरा भाग 

एखाद्या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग असणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या दोघांच्या संसारात आता एका गोंडस बाळाचा जन्म होणार आहे. त्यामुळे दोन्ही घरात आता बाळाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर गौरीच्या गरोदरपणात गौतमची तिला बरोबरीची साथ मिळत आहे. त्यामुळे ‘व्ही आर प्रेग्नेंट’ असं ही दोघंही म्हणत आहेत.

- Advertisement -

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रदर्शीत

पहिल्या दोन भागांप्रमाणेच या तिसऱ्या भागाचेही दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केलं आहे. या आधी प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई- पुणे- मुंबई’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित झाला. तो सिक्वलही तुफान गाजला. गोवा, गुजरात, कर्नाटक इतकच नाही तर परदेशातही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद चित्रपटाला मिळाला. आता या दोघांच्या प्रेमाने रंगलेला आणि लहान बाळाच्या आगमनासाठी आतुरलेल्या या दोघांची गोष्ट ‘मुंबई- पुणे-मुंबई ३’ ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

वाचा : लवकरच येणार मुंबई पुणे मुंबई ३

वाचा : ‘मुंबई – पुणे – मुंबई ३’ चे टीझर लाँच!

वाचा : कुणी येणार गं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -