घरमहाराष्ट्रदीड महिन्यांपूर्वी ५० थरांची सर्वात मोठी हंडी फोडली, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

दीड महिन्यांपूर्वी ५० थरांची सर्वात मोठी हंडी फोडली, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणूनच, दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली, अशी मिश्किल टीप्पणी एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली.

ठाणे – धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदे आज उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांना संबोधून भाषण केलं. “शेतकरी, कष्टकऱ्यांप्रमाणेच हे सरकार गोविंदांचंही आहे. दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते. गुवाहाटीला जायचं आहे? गुवाहटीला जाऊया. मुंबई, सूरत व्हाया गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – मुंबई-ठाण्याच्या रस्त्यांवर गोविंदा पथकांचा जल्लोष; उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून सेनेचे ४० आमदार फोडले. तर १० अपक्षांनाही त्यांनी आपल्या बाजूने वळवून घेतले. ५० आमदारांना घेऊन त्यांनी ठाकरेंविरोधात बंड पुकारले आणि ५० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. ३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणूनच, दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली, अशी मिश्किल टीप्पणी एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली.

“आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली दीड महिन्यापूर्वी. तशी हंडी कठीण होती ना आणि खूप उंच होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे फोडली हंडी. बाळासाहेब, दिघेसाहेबांच्या आशिर्वादामुळे फोडली. ५० थर लावले,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –  टेंभीनाक्यावर उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी; बाळासाहेबांचा फोटो लावून मविआवर निशाणा

एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे सरकार फक्त शेतकरी, कष्टकाऱ्यांचं नाही तर गोविंदांचंही आहे. आम्ही कबड्डी, खो-खोप्रमाणेच दहीहंडीलाही खेळाचा दर्जा दिला. प्रताप सरनाईक याप्रकरणी सतत पाठपुरावा करत होते. अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला. सोबतच, आम्ही गोविंदांसाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दहीहंडीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. तर, अपघात घडल्यास गोविंदांसाठी विमाही जाहीर केला आहे. तसेच, पुढच्यावर्षीपासून प्रो कबड्डीप्रमाणेच प्रो गोविंदा स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.”

हेही वाचा – दहीहंडीनिमित्ताने शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमने सामने; वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार?

मर्यादा वगैरे बस झाल्या. दोन वर्षे मर्यादा, नियम पाळले. नियम तर पाळले पाहिजेत. गणपती हा आपला दैवत आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण गणेशोत्सव आहे. त्यामुळे नियम शिथिल केले. पैसेही माफ केले. किती पैसे मिळणार आहेत त्यातून. दोन अडीच वर्षांत आपण निर्बंधात होतो. पण विघ्नहर्त्यांने आपले विघ्न दूर केले. मोठ्या धूमधडाक्यात सण साजरा करूया. नियम पाळून सर्व साजरं करूया, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -