घरताज्या घडामोडीकोल्हापुरात न्यायासाठी चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापुरात न्यायासाठी चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

एका तरुणाने भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते.

एका तरुणाने भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. कोल्हापुरमध्ये चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याचे समजते. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. (a young man attempted suicide in front of chandrakant patil at kolhapur)

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजू कांबळे असं या तरुणाचे नाव आहे. कोल्हापूरातील जिल्हाधिकारी दालनासमोर संतोष याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी त्याच्या जवळ धाव घेत आणि त्याला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्याची मागणी संतोषने केली होती. मात्र सातत्याने मागणी करूनही न्यान मिळत नसल्याने त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी आत्मदहन करणाऱ्या संतोष कांबळेची विचारपुसही केली नाही.

त्यानंतर, पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पाटील हे आपला ताफा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या संतोष कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, शेतीच्या प्रश्नामुळे त्रस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी 23 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यामध्ये सुभाष देशमुख काही प्रमाणात भाजले होते. त्यांना उपचारार्थ मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्बेतीची चौकशी करत त्यांची अडचण जाणून घेतली. मात्र, सोमवार 29 सप्टेंबर रोजी दुपारी सुभाष देशमुख यांचा अखेर मृत्यू झाला.


हेही वाचा – न्याय हक्कासाठी मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -