घरदेश-विदेश'एक व्यक्ती एक पद' धोरणाचा राहुल गांधींकडून पुनरुच्चार; गेहलोत यांना धक्का

‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाचा राहुल गांधींकडून पुनरुच्चार; गेहलोत यांना धक्का

Subscribe

काँग्रेसने या वर्षाच्या सुरुवातीला राजस्थानच्या उदयपूरमध्ये 'एक व्यक्ती एक पद' हा नियम स्वीकारला, त्यात तीन दिवसांच्या बैठकीअंतर्गत सुधारणा आणि निवडणुकांवर चर्चा झाली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली होत आहेत.अशातच राहुल गांधी(rahul gandhi) यांची सुद्धा भारत छोडो यात्रा सुरु आहे. आज राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ला पाठिंबासुद्धा दर्शवला आहे. काँग्रेस(congress) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दुहेरी भूमिका बजावण्यासाठी दोन पदं मिळू शकत नाहीत. यापूर्वी, गेहलोत असे म्हणाले होते की, ते राजस्थानचे मुख्यमंत्री आणि अध्यक्ष या दोन्ही पदांवर कायम राहू शकतात. “आम्ही उदयपूरमध्ये एक वचनबद्धता केली आहे, मला आशा आहे की ती कायम राखली जाईल,” असं राहुल गांधी केरळमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. या पदाच्या उमेदवारांना सल्ला देताना ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपद हे एक वैचारिक पद आहे. भारताचा दृष्टिकोन मांडणारं हे पद आहे.

हे ही वाचा – आम्ही ‘धन’से कमी, पण ‘मनसे’ लई आहोत; मनसेच्या राजू पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

- Advertisement -

अशोक गेहलोत(ashok gehlot) हे काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी गांधी कुटुंबाने संमती दर्शविण्याची सुद्धा बोलले जाते. पण असं असलं तरीही अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाहीत. जरा त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडले तर त्या जागी सचिन पायलटच्या विराजमान होतील. अशी भितीही अशोक गेहलोत यांच्या मनात आहे. सचिन यांनी बंडखोरी केल्यामुळे 2020 साली त्यांचे सरकार पडता पडता वाचले होते.

हे ही वाचा – दसरा मेळाव्याकरता उच्च न्यायालयात सर्व कागदपत्र सादर केली, अनिल परबांची माहिती

- Advertisement -

काँग्रेसने या वर्षाच्या सुरुवातीला राजस्थानच्या उदयपूरमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम स्वीकारला, त्यात तीन दिवसांच्या बैठकीअंतर्गत सुधारणा आणि निवडणुकांवर चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधी यांचे हे शब्द अशोक गेहलोत यांना न पटणारे होते. कारण अशोक गेहलोत हे आजवर प्रत्येकवेळी एकापेक्षा अधिक पदे भूषवत आले आहेत. दरम्यान अशोक गेहलोत यांनी बुधवारी सोनिया गांधी(soniya gandhi) यांची सुद्धा भेट घेतली.

भारत जोडो यात्रेबद्दल(bharat jodo yatra) राहुल गांधी(rahul gandhi) म्हणाले की, द्वेष आणि हिंसाचार कमी करणे हेच हेच या यात्रेचे ध्येय आहे. गरिब बाबी श्रीमंत यांच्यातील दरीसुद्धा प्रचंड वाढली आहे. हिंसा आणि सांप्रदायिकतेबाबत आमचे शून्य सहिष्णुतेचे धोरण आहे. हा प्रवास माझा नसून लोकांचा आहे, मी फक्त या प्रवासाचा एक भाग आहे. असंही राहुल गांधी म्हणाले.

हे ही वाचा – २५ सप्टेंबरला इंडियन नॅशनल लोकदलाचा हरियाणात महामोर्चा, शरद पवार आणि नितीश यांच्यासह बडे नेते होणार सहभागी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -