घरताज्या घडामोडी'हे षडयंत्र भाजपाचंच'; राज ठाकरेंच्या पत्रानंतर अरविंद सावंतांचा भाजपावर हल्लाबोल

‘हे षडयंत्र भाजपाचंच’; राज ठाकरेंच्या पत्रानंतर अरविंद सावंतांचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक न होता ऋतुजा लटके यांची बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्रावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “हे षडयंत्र भाजपाचेच” असा टोलाही त्यांनी लगावला. (After mns raj thackeray letter to devendra fadnavis arvind sawant slams bjp)

एका वत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “हा प्लॅन कोणाचा? हे षडयंत्र भाजपाचेच होते. शिंदे गट हातातील बाहुले आहेत. त्यांचा वापर करून शिवसेनेचे खच्चीकरण सुरू आहे. हे एकच भाजपाचे उद्दिष्ट आहे”, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.

- Advertisement -

“अंधेरीत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा की, नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ही पहिली भूमिका मांडली त्याला थोडा उशीर झाला. ही भूमिका स्वागतार्ह आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांनी या संस्कृतीची भाजपाला आठवण करून दिली हेही खूप झाले. उशीर झाला हे मी म्हटलो कारण उमेदवारी अर्ज भरूपर्यंत बराच वेळ गेला. मधल्या काळात तमाशा करण्यात आला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे विधानसभेची निवडणूक लागली आहे”, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

याशिवाय, “शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवायला लावलेते उभे राहिले का?”, असा प्रश्नही यावेळी अरविंद सावंत यांनी विचारला. दरम्यान, अरविंद सावंत यांच्या या प्रश्नाला भाजपाकडून उत्तर दिले जाणार का. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी, शरद पवारांचे भाजपाला आवाहन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -