घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमा.नगरसेवक शाम साबळेंची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

मा.नगरसेवक शाम साबळेंची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Subscribe

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक शाम साबळे यांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेत फुट पडल्यापासूनच साबळे हे शिंदे गटाच्या बाजूने होते. पालकमंत्री भुसे यांच्यासोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, बैठकीत त्यांची उपस्थिती होती. या कारवाई बद्दल साबळे यांनी मात्र कोणतेही आश्चर्य व्यक्त केले नाही. ‘मी राजकरणातून अलिप्त होण्याचा निर्णय घेतल्याने फार आधीच पक्ष सोडणार असल्याची कल्पना स्थानिक नेतृत्वाला दिली होती त्यामुळे अश्या कारवाईने वाईट वाटण्याचे कारण नाही’ असे साबळे यांनी सांगितले.

राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडून शिवसेनेत मोठी फुट पडली, तब्बल ४० शिवसेना आमदार व इतर १० आमदारांच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यासगळ्या घडामोडींचा दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळीकडेच परिणाम जाणवला. शिवसेनेत अगदी शाखास्तरावर सुद्धा फुट पडली. नाशिक शहरात अद्याप नगरसेवक, पदाधिकारी स्तरावर फुटीचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नसले तरी अनेक पदाधिकारी, नगरसेवक कुंपणावर आहेत. मा. नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्याचवेळी इतरही अनेक नगरसेवक जातील असे बोलले जात होते. मात्र, निवडणुका अद्यापही टप्प्यात नसल्याने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचे बोलले जाते. परंतु अनेक नगरसेवक छुप्या पद्धतीने तर काही उघडपणे शिंदे गटसोबत दिसून येत आहेत.

- Advertisement -

शाम साबळे यांनी २०१७ साली ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पॅनलमध्येच निवडणूक लढवत महानगरपालिकेत एन्ट्री केली होती. साबळे हे पूर्वी पासूनच पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय असल्याने शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते शिंदे गटासोबतच जातील अश्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. सत्तांतर झाल्यानंतरही साबळे यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रम, बैठका याठिकाणी दादा भुसे यांच्यासोबत बघितल्या गेले होते. त्यामुळे त्यांनी अघोषित रित्या शिंदे गटात प्रवेश केल्याच बोलल जात होत.

  स्थानिक राजकरणात झालेल्या त्रासामुळे तसेच व्यावसायिक व कौटुंबिक कारणांमुळे फार आधीच राजकारणातून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला होता. पालकमंत्री दादा भुसे व माझे अत्यंत मैत्री व सलोख्याचे संबंध असल्याने मी आधीपासूनच त्यांचा समर्थक राहिलो आहे. मी स्थानिक नेतृत्वाला देखील आधीच पूर्ण कल्पना दिली होती. त्यामुळे हकालपट्टी करण्याआधीच मी पक्षीय राजकरणातून अलिप्त झालेलो आहे. : शामकुमार साबळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -