घरदेश-विदेशअखेर 'ती' आलीच! पावसामुळे नव्हे तर 'लानीना'मुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत थंडीला सुरुवात

अखेर ‘ती’ आलीच! पावसामुळे नव्हे तर ‘लानीना’मुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत थंडीला सुरुवात

Subscribe

यंदा मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओल्या दुष्काळाप्रमाणे परिस्थती निर्माण झाली आहे. बहुतांश राज्यातील शहर पाण्याखाली जाणार असे चित्र निर्माण झालं होतं. मात्र ऑक्टोबरमध्ये दोन आठवडे थैमान घातल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. अशात आता कडाक्याच्या थंडी चाहून लागली आहे. पावसामुळे नाही तर लानीना या वातवरणीय बदलामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये 6 ते 7 नोव्हेंबरदरम्यान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसानंतर अखेर जिची सर्वजण वाट पाहत होते ती थंडी आलीच.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भागातील डोंगराळ भागात बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचेल. त्यामुळे 6 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह अनेक भागात थंडीत वाढ होईल. पुढील आठवड्यात गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशात रात्री थंडी जाणवेल. पण दुपारी तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअंश राहील. मध्य भारतात काही ठिकाणी धुके पडले, पुढील आठवड्यापासून देशाच्या अनेक भागांतील तापमानात घट होईल.

- Advertisement -

पावसामुळे नव्हे, तर ला-नीनामुळे थंडी

यंदा थंडी मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पण यामागे पाऊस नव्हे तर लानीना हे कारण आहे. ला-नीना ही सागरी व वातावरणातील बदलाची एक घटना आहे. यामुळे अनेक भागातील थंडीचे प्रमाण वाढणार आहे. ला-नीनाचा प्रभाव यंदा हिवाळ्यात जाणवणार आहे. ला-नीना हा प्रभाव मार्च 2023 पर्यंत कायम राहणार आहे, त्यामुळे पुढील चार महिन्यात भारतात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबईकरांची तहान महागली; पाणीपट्टीत झाली इतक्या टक्क्यांची वाढ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -