घरदेश-विदेशअफगाणिस्तान - पाकिस्तानपासून युरोपसह भारताला पोलिओचा धोका

अफगाणिस्तान – पाकिस्तानपासून युरोपसह भारताला पोलिओचा धोका

Subscribe

25 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाकिस्तानमध्ये पोलिओचे 20 रुग्ण आढळले तर अफगाणिस्तानमध्ये 2 रुग्ण आढळले.

मागील दोन वर्षांपासून जगभरच कोरोनाचा (corona) धोका असल्याने संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली होते अशातच आता कुठे या परिस्थितीतून सावरत असताना आता पोलिओचा (polio virus) धोका वाढतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिओ सारख्या प्राणघातक विषाणूचा धोका आता वाढत आहे. दरम्यान अफगाणिस्तानमध्ये यादवीसदृश्य परिस्थिती आहे तर पाकिस्तानात पूरपरिस्थितीमुळे या दोन्ही देशांमध्ये यावर्षी पोलिओ बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दरम्यान या पोलिओ विषाणूचा (polo virus) शिरकाव भारतात सुद्धा होण्याचा धोका वाढत आहे. पोलिओच्या विषाणू कोरोनापेक्षा चार पटींनी लहान असला तरीही याचा प्रसार कोरोनापेक्षा चारपट वेगाने होतो.

संपूर्ण जग मागील दोन वर्षांपासून कोरोना विरुद्ध लढा देत होते. हा लढा यशस्वी होत असताना अमेरिका (america), युरोप आणि भारतात आता पोलिओचा धोका वाढू लागला आहे. दरम्यान पोलिओचा विषाणू न्यूयॉर्कमध आढळाल्यानंतर तिथे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. वेळेवर लसीकरण झाले नसल्याचा हा परिणाम आहे असे युनिसेफचे मत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – पंतप्रधान मोदींनी मोरबी दुर्घटनाग्रस्त भागाची केली पाहणी; पीडितांना हवी ती मदत करण्याचे दिले निर्देश

जगभरात पोलिओचा धोका

- Advertisement -

दरम्यान न्यूयॉर्क (new york) मधील तीन ठिकाणी सांडपाण्यात पोलिओचा विषाणू आढळला. तर त्या पूर्वी जून महिन्यात लंडन मधील सांडपाण्यातशुद्दच हा अविषाणू आढळला होता. दरम्यान भारतातील पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता (kolkata) शहरातीळ सांडपाण्यातसुद्धा हा विषाणू आढळून आला आहे. दरम्यान 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाकिस्तानमध्ये पोलिओचे 20 रुग्ण आढळले तर अफगाणिस्तानमध्ये 2 रुग्ण आढळले.

पाकिस्तानमध्ये पुरामुळे तर अफगाणिस्तानमध्ये यादवीमुळे स्थलांतर वाढले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश भारताच्या शेजारी आहेत. त्यामुळे भारताचाही धोका वाढतो आहे. अशी माहिती राष्ट्रीय पोलिओ प्लस समितीचे अध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली.

1998 पासून पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू

1998 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. प्रतिवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. घरोघरी जाऊन ‘पोलिओ रविवार’ झाल्या नंतरच्या आठवड्यात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओचे डोस पाजले गेले. पोलिओसंदर्भात जनतेला भावनिक आवाहनही केले गेले त्यासाठी अमिताभ बच्चन महम्मद कैफ यांना सोबत घेऊन दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जनतेला भावनिक आवाहन केले गेले आणि जनजागृती सुरु ठेवली.

हे ही वाचा – तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, तर उत्तर भारतात बर्फवृष्टी

भारत सरकारचे विशेष प्रयत्न

दिल्ली (delhi) सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिओविरुद्ध लढा देण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर प्रयत्न सुरू केले होते, असे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, जागतिक स्तराचा विचार केला तर एकूण पोलिओग्रस्तांपैकी भारतामध्ये 60 टक्के प्रकरणे आढळत होती. मात्र सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम डिसेंबर 1993 मध्ये तयार केला आणि 2 आॅक्टोबर, 1994 पासून या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यादिवशी पोलिओमुक्त भारत करण्यासाठी पहिल्या बालकाला पोलिओचा डोस देण्यात आला. देशातल्या 4000 केंद्रांवरून जवळपास 12 लाख बालकांना डोस देण्यात आला. पल्स पोलिओ कार्यक्रमाचा दृष्य परिणाम 1995 पासून जाणवू लागला. आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अशाच पद्धतीने पोलिओच्या कार्यक्रमाचे अनुकरण करण्यात आले. एक वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व अशियातल्या अनेक देशांनी या रणनीतीचे अनुकरण केले आणि तसाच कार्यक्रम राबविला. आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी ‘किक पोलिओ आउट ऑफ आफ्रिका’ ही मोहीम सुरू केली, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

हा कार्यक्रम सुरू होण्याआधी जगभरातील पोलिओ रुग्णांपैकी भारतामध्ये पोलिओचे 60 टक्के रुग्ण होते. दि. 13 जानेवारी, 2011 रोजी हावडा येथे देशातला शेवटचा पोलिओ रूग्ण सापडल्याची नोंद आहे. त्यांनतर गेल्या एक दशकापासून देश पोलिओमुक्त झाला आहे.

हे ही वाचा –  महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -