घरमहाराष्ट्रपाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ; जत तालुक्यातील ४० गावांचा सरकारला अल्टिमेटम

पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ; जत तालुक्यातील ४० गावांचा सरकारला अल्टिमेटम

Subscribe

बोम्माईंनी जत तालुक्यावर दावा केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. दोन्ही राज्यात भाजपाचे सरकार असल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने राज्य सरकारला घेरलं आहे. तर, आता जत तालुका पाणी कृती समितीनेही महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

सांगली – पाणीप्रश्नावरून सांगलीतील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला होता. त्यावरून आता जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीने सरकारला दिला आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकाचा दावा

- Advertisement -

जत तालुक्याला (सांगली जिल्ह्यातील) भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, त्यांना पाणी देण्यासाठी आम्ही एक कार्यक्रम घेऊन आलोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले होते. तेथील सर्व ग्रामपंचायतींनी जत तालुका कर्नाटकात सामील व्हावा, असा ठराव केलाय. जत तालुका कर्नाटकात यावा याचा गांभीर्याने विचार करत असल्याचंही बसवराज बोम्मई यांनी सांगितलंय. बोम्मई म्हणाले, “आम्ही कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत महाराष्ट्रातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात राहणार्‍या कन्नडिगांनी स्वातंत्र्य लढा, एकीकरण चळवळ आणि गोवा मुक्तीसाठी लढा दिला, त्यांना पेन्शन दिली जाईल. आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करीत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – शिवाजी महाराजांचा अपमान विसरण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्क्रिप्ट दिलीय, संजय राऊतांचा घणाघात

- Advertisement -

बोम्माईंनी जत तालुक्यावर दावा केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. दोन्ही राज्यात भाजपाचे सरकार असल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने राज्य सरकारला घेरलं आहे. तर, आता जत तालुका पाणी कृती समितीनेही महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

हेही वाचा – … अन्यथा महाराष्ट्राचं नवं महाभारत घडेल, सीमावादावरुन संजय राऊतांचा सरकारला इशारा

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यावर दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे. इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत? असा सवाल जत तालुका पाणी कृती समितीने विचारला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे. पाणी द्या नाही तर आम्ही एनओसीची वाट पाहणार नाही. थेट कर्नाटकता जाऊ असा इशारा समितीने दिला आहे. याबाबत आज, सायंकाळी पाच वाजता उमदीमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -