घरमहाराष्ट्रदेवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंचा घणाघात

देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Subscribe

आज डीपी जळतायत, किती लोक तुमच्याकडे मदतीला येत आहेत. डीपी जळल्यानंतर पटकन तुम्हाला रिपेअर करून मिळतोय. वीजबिलाची वसुली थांबलेली आहे का चालू आहे, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला

बुलढाणाः देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, असं म्हणत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीची क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या चिखलीत सभा घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. आज डीपी जळतायत, किती लोक तुमच्याकडे मदतीला येत आहेत. डीपी जळल्यानंतर पटकन तुम्हाला रिपेअर करून मिळतोय का?. वीजबिलाची वसुली थांबलेली आहे का चालू आहे, असे सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेत.

तेव्हा काय बोलत होते, मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, याठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे. त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये वीजबिल भरलेले आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडतो की त्या ठिकाणी आवाज जाईल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय.

- Advertisement -

या ठिकाणी आणि त्या ठिकाणी करताय ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. वीजबिल माफ करा, शेतकऱ्यांच्या बिलाचे साठलेले पैसे तुम्ही द्या आणि शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करा. चला या ठिकाणी आणि त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. वरती बसल्यावर वेगळी भाषा आणि खाली उतरल्यावर वेगळी भाषा, जी कर्जमुक्ती आम्ही केली होती, तिचा लाभ यांना मिळाला की नाही ते विचारा. जी कर्जमाफी तुम्ही केली होती, त्या अटी किती होत्या. कर्जमाफ किती लोकांचं झालं हेसुद्धा विचारा, माझं जाहीर आव्हान आहे. पश्चिम विदर्भाचा भाग राहिला होता, कारण जेव्हा आपण कर्जमाफी आणि कर्जमुक्ती जाहीर केली, तेव्हा ती योजना 31 मेपर्यंत पूर्ण करायची होती. दुर्दैवानं कोरोनाचं संकट आलं आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली. पण आपण स्वतः सरकारने गॅरंटी दिली आणि त्यांचं कर्जसुद्धा माफ करायला लावलं होतं. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा आणि पूर्तता सुरू करत होतो आणि या रेड्यांनी शेण खाल्लं. कोणाचं नुकसान झालं, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.


हेही वाचाः ‘ज्याला स्वत:चेच भविष्य माहीत नाही, ते आपले भविष्य ठरवणार’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -