घरमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जळगावात तुफान राडा, भाजपच्या २५ वर्षीय कार्यकर्त्याचा मृत्यू

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जळगावात तुफान राडा, भाजपच्या २५ वर्षीय कार्यकर्त्याचा मृत्यू

Subscribe

राज्य निवडणूक आयोगाकडून ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. परंतु आज तब्बल ७ हजार १३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. जवळपास ७४ टक्के मतदान रविवारी पार पडलं. मात्र, आजच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू असतानाच जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर तुफान राडा झाला. यावेळी या घटनेत भाजपच्या २५ वर्षीय कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन्ही समूहांकडून तुफान दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकारात एक भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे दोन्ही गटात शाब्दीक वाद झाले आणि कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरू केली. या प्रकारात अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

- Advertisement -

जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचं नाव धनराज माळी असं आहे. जखमी झाल्यानंतर धनराज माळीला कार्यकर्त्यांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, ग्रामपंचायतीचे सध्याचे निकाल पाहिले असता भाजप १०१३, शिंदे गट ५४०, ठाकरे गट ४३०, राष्ट्रवादी काँग्रेस ६६७, काँग्रेस ४४५ आणि इतर ६०२ जागांवर विजय मिळवला आहे. परंतु या निवडणुकीच्या निकालात भाजपने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -