घरअर्थजगतNew Year 2023 : उद्यापासून 'या' पाच सेवांमध्ये होणार बदल, आताच जाणून...

New Year 2023 : उद्यापासून ‘या’ पाच सेवांमध्ये होणार बदल, आताच जाणून घ्या त्याची माहिती!

Subscribe

New Year 2023 | नवीन वर्षांत बरेच बदल होतात. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, वाहने, आधार कार्ड, पॅनकार्ड संदर्भातील अनेक नियम बदलणार आहेत. ते जाणून घ्या.

New Year 2023 | नव्या वर्षाला आता अवघ्या काही तासांतच सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात बरेच बदल घडतात. त्याचप्रमाणे अर्थविश्वातही अनेक बदल नियोजित असतात. अगदी उद्यापासूनच हे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हीही हे बदल आताच वाचून घ्या.

बँक लॉकर सुविधेत बदल

- Advertisement -

भारतीय रिझर्व्ह बँकेने नव्या वर्षासाठी काही नियम आणले आहेत. त्यानुसार, येत्या वर्षात लॉकरमध्ये ठेवलेल्या अमुल्य वस्तूंची काळजी बँकेलाच घ्यावी लागणार आङे. नव्या नियमानुसार बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी बँकेची असणार आहे. याबाबत बँक आणि ग्राहकांमध्ये करार करण्यात येणार आहे. हा करार ३१ डिसेंबरपर्यंत वैध राहणार आङे. लॉकर संदर्भातील सर्व नियम बँकांनी ग्राहकांना मॅसेजद्वारे पाठवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा – केंद्राकडून ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले

- Advertisement -

क्रेडिट कार्ड पॉइंट

क्रेडिट कार्डच्या वापरासंदर्भातही १ जानेवारी २०२३ मध्ये नियम बदलणार आहेत. क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यानंतर काही पाँइट्स ग्राहकांना मिळतात.नव्या वर्षापासून एचडीएफसी बँक आपल्या क्रेडिट कार्डमधील रिवॉर्ड पाँट्समध्ये बदल करणार आहे. त्यामुळे आजच रिवॉर्ड इनकॅश करायला विसरू नका. कारण उद्यापासून हे नियम बदलणार आहेत.

वाहने महागणार

नवीन वर्षात वाहन खरेदी महागणार आहे. प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी म्हणजेच एमजी मोटर, मारुती सुझुकी, ह्युंडाई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्जिडिज-बेंचर सारख्या कंपन्यांच्या गाड्या महाग होणरा आहेत. २ जानेवारी २०२३ पासून टाटा मोटर्सच्या गाड्यांची किंमत वाढणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. होंडाच्या गाड्यांमध्ये ३० हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – देशाच्या तिजोरीत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान, पहिल्या पाच राज्यांत आणखी कोण?

बिलिंग व्यवस्थेत बदल

जीएसटीच्या ई-इनवॉइस आणि इलेक्ट्रॉनिक बिलासंदर्भातही काही नियम बदलणार आहेत. इ-इनवॉईससाठी २० कोटींची मर्यादा घटवून ५ कोटी केली आहे. जीएस्टी नियमाचे हे बदल १ जानेवारीपासून लागू होणार आहेत. म्हणजेच, ज्या व्यवसायांचा टर्नओव्हर ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना आता इलेक्ट्रॉनिक बिल बनवणं गरजेचं आहे.

…तर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याचा उपक्रम गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. अद्यापही अनेक नागरिकांनी हे दोन्ही कार्ड्स लिंक केलेले नाहीत. त्यामुळे आता हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्ड लिंक नाही केले तर १ एप्रिल २०२३ पासून पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाणरा आहे.

हेही वाचा – नोटाबंदीचा फज्जा? सहा वर्षांत व्यवहारातील चलनी नोटा वाढल्या, अर्थमंत्र्यांनी आकडेवारीच केली सादर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -