घरताज्या घडामोडीराहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा, मविआला सुरुवातीलाच धक्का?

राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा, मविआला सुरुवातीलाच धक्का?

Subscribe

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मविआला आता सुरुवातीलाच धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी कलाटेंच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र जाहीर केलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं की, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा झाली.

- Advertisement -

कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही. आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.

पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपी बरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.

- Advertisement -

पिंपरी चिंचवड मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.

गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी मध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे, असं रेखा ठाकूर यांनी पत्रात म्हटलं आहे.

महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केल्यानंतरही राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. ते चिंचवडमध्ये आता शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -