घरमहाराष्ट्रBarsu Refinery Protest: आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून महिलांना मारहाण; दोन जखमी

Barsu Refinery Protest: आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून महिलांना मारहाण; दोन जखमी

Subscribe

बारसू आंदोलनात महिलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर महिलांना मारहाण करतानाचा व्हिडीओ काढला म्हणून पोलिसांनी आंदोलनात सहभागी तरुणाचा फोन हिसकावून घेतल्याचा प्रकारही समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारात दोन आंदोलक किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती आहे.

बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरु होणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. बारसूच्या माळरानावर आज, शुक्रवारी हजारोंच्या संख्येने आंदोलक पोहोचले आहेत. हे आंदोलन चिघळताना दिसत आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. गावकऱ्यांनी ब‌‌ॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, यावेळी महिलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर महिलांना मारहाण करतानाचा व्हिडीओ काढला म्हणून पोलिसांनी आंदोलनात सहभागी तरुणाचा फोन हिसकावून घेतल्याचा प्रकारही समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारात दोन आंदोलक किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती आहे.  ( Ratnagiri Barsu Refinery Protest Protest rages women beaten by police Two injured )

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धूराचा वापरदेखील करण्यात आला. आंदोलनस्थळी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्याने आग लागल्याची घटना घडली.

- Advertisement -

विनायक राऊतांना अटक तर दोन आंदोलक जखमी

आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी त्यांना पांगवण्यास सुरुवात केली आहे. राऊतांसह साते ते आठ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. काही महिलांना पोलिसांनी अडवलं आहे. पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यात दोन-तीन आंदोलक किरकोळ जखमी झाले आहेत.

( हेही वाचा: Barasu Refinery: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक; बारसूतील वातावरण तापलं )

- Advertisement -

प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न- उदय सामंत

निर्माण झालेल्या या तणावाच्या खोलाशी जाणं गरजेचं आहे. विद्यमान खासदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत: पत्र देऊन एक्स्पोज झाल्याने काहीही करुन या प्रकल्पाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले. लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरु आहे. बाहेरुन लोक आंदोलनात सहभागी झाली आहेत. आंदोलकांचं काहीही म्हणणं असलं तरी सरकार चर्चेसाठी तयार आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -