घरमहाराष्ट्रBarasu Refinery: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक; बारसूतील वातावरण तापलं

Barasu Refinery: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक; बारसूतील वातावरण तापलं

Subscribe

बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेची माहिती विनायक राऊत यांनी स्वत: ट्वीट करत दिली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला आंदोलक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेची माहिती विनायक राऊत यांनी स्वत: ट्वीट करत दिली आहे.  ( Barasu Refinery Thackeray group MP Vinayak Raut arrested  )

बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचे अमानुष अत्याचार सुरु असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी बुधवारी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रांतीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आज मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली.

तसचं, रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे रिफायनरी विरोधक गनिमी काव्यांना आंदोलन करण्याची शक्यता आहे. रिफायनरीबाबत शिंदे-फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार विनायक राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

बारसूतल्या स्थानिक लोकांना विश्वासात घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे, असा सवाल आज खासदार संजय राऊत यांनी पवारांना विचारला. बारसूत सरकारने तातडीने सर्वेक्षण आणि भूसंपादन मागे घ्यावं, अशी मागणी ठाकरे गटातर्फे संजय राऊत यांनी मांडली. मात्र, आता राऊत हे ठाकरेंचे राहिले नाहीत आणि पवारांचेही राहिले नाहीत, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.

( हेही वाचा: meow meow केल्यावर मालकाला राग का आला? नितेश राणेंचा राऊतांना सवाल )

बारसू परिसरातील अनेक जमिनी या राजकारणींच्या असून त्यांची नाव जाहीर करा, अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. मात्र अशी मागणी करुन राऊत उद्धव ठाकरेंनाच अडचणीत आणत असल्याचं, नितेश राणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -