घरमहाराष्ट्र"सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत नैराश्यात", नारायण राणेंची टीका

“सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत नैराश्यात”, नारायण राणेंची टीका

Subscribe

"ज्या माणसाने अडीच वर्षात तरुनांना एकही नोकरी दिलेली नाही. तरुनांसाठी एकही उपक्रम राबविला नाही", अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेवर केली आहे.

मुंबई | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या नैराश्यात गेले आहेत”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. जेव्हा देशाला १०० वर्ष पूर्ण होतील. तेव्हा देश हा आत्मनिर्भर बनलेला असेल, असा दावाही नारायण राणेंनी रोजगार मेळाव्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना केला आहे.

एकनाथ शिंदेचा पोपट मेलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले, पत्रकारांनी नारायण राणेंना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “संजय राऊतांकडे सध्या काम नाही. संजय राऊतांची संपादक म्हणून ही भाषा योग्य वाटते का?, असा उलट सवालही त्यांनी माध्यमांना केला. नारायण राणे पुढे म्हणाले, “पोपट जेव्हा शिवसेनेत होता, तेव्हा तो भरारी घेत होता. मातोश्रीत येत होता, तेव्हा तो चांगला वाटत होता. आता पोपट मेला?, महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पदी कोणीही असो, मुख्यमंत्री हे मोठे पद आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल कोणी अपशब्दाने बोलू नये. संजय राऊतसारख्या संपादकाने अशी भाषा वापरणे योग्य नाही. यामुळे संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सध्या नैराश्यात आहेत. सत्ता गेल्यामुळे ते वेड्यासारखे बडबड करत आहेत. हो दोघेही चांगले बोलू शकत नाहीत.

- Advertisement -

उद्धव ठकारे २ तासही मंत्रालयात गेला नाही. 

नारायण राणे म्हणाले. “ज्या माणसाने अडीच वर्षात एकही नोकरी दिलेली नाही. तरुनांसाठी एकही उपक्रम राबविला नाही. रिकाम टेकडा माणूस अडीच वर्षात २ तासच मंत्रालयात गेला नाही. उद्धव ठाकरेंची तुलना ही पंतप्रधानांशी होऊ शकत नाही. प्रत्येक राज्यात निवडणुका होत असतात आणि या निवडणुकीत विजय पराजय होत असतो. उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही”, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदेंचा पोपट मेलाय फक्त अध्यक्षांनी जाहीर करणं बाकी; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

२०३० मध्ये देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल

“देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा १०० वर्ष होतील, तेव्हा आपला देश आत्मनिर्भर आणि महासत्ता बनेल. यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत हा पाचव्या क्रमांकावर आला आहे. २०३० साली देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर येईल, जागतिक पातळीवर देशाची प्रगती सुरू आहे”, असे नारायण राणेंनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -