घरमहाराष्ट्र'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून अंबादास दानवेंची खोचक टीका, म्हणाले...

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून अंबादास दानवेंची खोचक टीका, म्हणाले…

Subscribe

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण या कार्यक्रमावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज (ता. 26 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाला जमलेली गर्दी प्रसार माध्यमांनी महाराष्ट्राला दाखवावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. पण या कार्यक्रमावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या कार्यक्रमासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ‘तनाने-धनाने’ मदत केली, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – लोकसभेंच्या जागांबाबत भाजप-शिवसेनेमध्ये धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी

- Advertisement -

अंबादास दानवे यांनी ट्वीट करत लिहिले की, “‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ‘तनाने-धनाने’ मदत केली. लोकं आणण्याशिवाय प्रत्येक तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यक १२ हजार आणि तलाठ्याला ६ हजार रुपये देण्याचे ‘आदेश’ सुटले होते. हे लाभार्थी वर्षभरापासून या मदतीच्या प्रतीक्षेत होते.”

- Advertisement -

“कांद्याला जाहीर झालेले अनुदान कुठे आहे. कापसाला भावाचा पत्ता नाही. बी बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत, त्यावर ब्र काढला नाही. आणि #मोदी किती भारी आहेत हे आम्हाला कर्नाटकात दिसलेच आहे. इथे पण कर्नाटकची पुनरावृत्ती अटळ आहे.” असे लिहीत त्यांनी भाजपचा कर्नाटकात झालेल्या पराभवावरून देखील त्यांना डिवचले आहे.

आजच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी जमवण्यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार, कृषी सहाय्यक आणि तलाठ्याला पैसे देण्यात आले होते. असा आरोप दानवे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. मोदी यांनी संसद भवनाची ऐतिहासिक इमारत बांधल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या टीकेला उत्तर देत दानवे म्हणाले की, मोदी किती भारी आहेत, हे आम्हाला कर्नाटकात दिसलेच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -