घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये भाजपच्या 'या' मंत्र्यांना होतं आव्हान!

छत्तीसगडमध्ये भाजपच्या ‘या’ मंत्र्यांना होतं आव्हान!

Subscribe

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला कडव आव्हान देत चांगलीच कट्टर दिली आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. रमन सिंग यांची पराभवाच्या दिशेने वाटचाल होत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच पानीपत होताना दिसत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला कडव आव्हान देत चांगलीच कट्टर दिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राज्यस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या पाचपैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचे श्रेय नक्कीच काँग्रेसच्या युवा शिलेदारांना जाते. त्यांनी भाजपच्या महत्त्वाच्या नऊ मंत्र्यांना काटे की टक्कर दिली.

या उमेदवारांना कडवं आव्हान

अंबिकापूर विधानसभेच्या जागेवरून भाजपाच्या अनुराग सिंहदेव यांच्यापुढे टीएस सिंहदेव यांचं आव्हान होत. काँग्रेसच्या चरणदास महंत यांची सक्ती विधानसभा जागेवर स्थिती मजबूत आहे. त्यांच्या विरोधात भाजपानं मेधाराम साहू यांना मैदानात उतरवलं. दुसरीकडे ताम्रध्वज साहू यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. ते दुर्गच्या ग्रामीण विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार आहेत. साहू हे दुर्ग लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची भाजपाच्या जागेश्वर साहू यांच्याशी लढत आहे. रायपूरच्या ग्रामीण विधानसभा जागेवरूनही सत्यनारायण शर्मा यांचा त्रिशंकू संघर्षाचा सामना आहे. त्यांना भाजपाचे नंदे साहू आणि जनता काँग्रेसचे ओमप्रकाश देवांगण यांच्याकडून कडवी लढत आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष राहिलेल्या शिव डहरिया यांना आरंगमधून भाजपा उमेदवार संजय ढीढी यांच्याकडून आव्हान आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भुपेश बघेल यांचाही मतदारसंघात जबरदस्त प्रभाव आहे. त्याचा सामना भाजपाच्या मोतीलाल साहू यांच्याशी होत आहे. राज्याचे पंचायत मंत्री भाजपचे अजय चंद्राकर यांना काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नीलम चंद्राकर कडवी झुंज देत आहेत. तर काँग्रेसच्या लक्ष्मीकांता साहू यांचाही प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. बिलासपूर विधानसभा जागेवरून राज्याचे अबकारी मंत्री अमर अग्रवाल यांना काँग्रेसच्या शैलेश पांडे टक्कर देत आहेत. रायपूर पश्चिमेकडच्या मतदारसंघातही बांधकाम मंत्री राजेश मूणत यांचा काँग्रेसच्या विकास उपाध्याय यांच्याशी सामना होणार आहे. रायपूर दक्षिणमधून राज्याचे कृषिमंत्री बृजमोहन अग्रवाल पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या कन्हैय्या अग्रवाल यांच्याशी होत आहे.

- Advertisement -

वाचा : Madhya Pradesh Elections 2018 : बसपा किंगमेकर? ७ जागी आघाडीवर

वाचा : Rajasthan Election 2018 : भाजप ७९, काँग्रेस १००

- Advertisement -

वाचा : Telangana Elections 2018 : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?

वाचा : Mizroam Election 2018: मिझो फ्रंट पुन्हा आघाडीवर

वाचा : Chhattisgarh Elections 2018 : छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -