घरदेश-विदेशलालूंच्या पुत्रांचे मतभेद आता चव्हाट्यावर

लालूंच्या पुत्रांचे मतभेद आता चव्हाट्यावर

Subscribe

लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलांच्या नात्यांमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी 'लालू-राबडी मोर्चा' या नव्या पक्षाची घोषणा केल्याने दोन भावांमधील मतभेद वाढले आहेत.

बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष दोन भागांमध्ये विभागला आहे. तर लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी ‘लालू-राबडी मोर्चा’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. यामुळे लालू यांच्या दोन पुत्रांच्या नात्यामधील कटुता चव्हाट्यावर आली आहे. सोबतच सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर केले आहे. तसेच राजदने सारण लोकसभा मतदारसंघातून तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण झाली आहे.

म्हणून तेजप्रताप नाराज

तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन महागठबंधनच्या उमेदवारांची घोषणा केल्याने परिस्थीती आणखी बिघडली आहे. माजी मंत्री चंद्रिका राज हे सारण मतदारसंघातून भाजपाच्या राजीव प्रताप रुडी यांना आवाहन देतील, अशी घोषणा राजदने केली आहे. चंद्रिका राय यांना तिकीट मिळणे हा तेजप्रताप यांच्यासाठी आणखी एक झटका होता. चंद्रिका राय हे तेजप्रताप यांचे सासरे आहेत. विशेष म्हणजे तेजप्रताप यांनी पत्नी एश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच तेजप्रताप यांनी शिवहर आणि जहानाबाद या दोन मतदारसघातून उमेदवार घोषित केले आहेत. जहानाबादमधून चंद्रप्रकाश ‘लालू-राबडी मोर्चा’चे उमेदवार असतील इथे सुरेंद्र यादव हे राजदचे अधिकृत उमेदवार आहेत.

- Advertisement -

माझी आई राबडी देवी यांनी तिथून निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. जर त्यांनी निवडणूक लढवली नाही तर त्या जागेवर मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही, कारण इथल्या जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.  – तेजप्रताप यादव

तेजप्रताप यादव यांचा राजीनामा

आपल्या पसंतीच्या लोकांना निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाकडून उमेदवारी न मिळाल्याने तेजप्रताप यांनी विद्यार्थी राजदच्या संरक्षण पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर तेजप्रताप यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, विद्यार्थी राजदच्या संरक्षकपदाचा राजीनामा देत आहे. मला अपरिपक्क समजणारे स्वत: अपरिपक्क आहेत. कोण किती पाण्यात आहे हे मला माहित आहे.

- Advertisement -

वाचा – तोपर्यंत मी घरी येणार नाही – लालू पुत्र तेजप्रताप

वाचा – तेजप्रताप यादव याने घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -