इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा; देशात राजकीय अस्थिरता

इटली मध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरता दिसत होती. अखेर इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

इटली मध्ये मोठया प्रमाणावर राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षांनी साथ न देते अनुपस्थिती लावली असल्याने इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी आपल्याहा पदाचा राजीनामा दिला आहे. मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्यांनंतर इटलीमध्ये मध्यवर्ती निवडणूका होण्याहची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इटली मध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरता दिसत होती. अखेर इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हे ही वाचा – मोठी बातमी! द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित, उरली फक्त औपचारिकता

पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी त्यांचा राजीनामा इटलीच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. मागील आठवड्यातच मारिओ द्राघी यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला होता. पण त्यावेळी मारिओ द्राघी यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी युतीमध्ये असलेल्या पक्षाने सभागृहात अनुपस्थिती लावली आणि म्हणून मारिओ द्राघी यांचं सरकार धोक्यात आलं. मारिओ द्राघी यांना विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षाने साथ सोडली आणि नाईलाजाने मारिओ द्राघी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मारिओ द्राघी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी सेंट्रल राईट पार्टी असलेल्या फोर्झा इटालीया, लिग आणि फाईव्ह स्टार मुव्हमेंट या पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळेच मारिओ द्राघी यांचं सरकार हे केवळ १७ महिन्यांतच कोसळले.

हे ही वाचा – दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती

मारिओ द्राघी यांची १७ महिन्यांची कारकीर्द

मारिओ द्राघी यांच्या सरकार मधील दुसरा मोठा पक्ष असलेला फाईव्ह स्टार मुव्हमेंट या पक्षाने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला आणि त्यामुळेच मारिओ द्राघी यांचे सरकार चांगलेच कोलमडले आणि त्या नंतर मारिओ द्राघी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मारिओ द्राघी २०२१ पासून इटलीच्या पंतप्रधानपदी स्थानापन्न झाले होते. या एकूण १७ महिन्यांच्या कारकिर्दीमध्ये मित्रपक्षांनी आपल्याला साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असंही मारिओ द्राघी म्हणाले.

हे ही वाचा – श्रीलंकेत जनता महागाईने त्रस्त, पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक कॅरम खेळण्यात व्यस्त